Home मनोरंजन येड लागलं प्रेमाचं मालिकेत अतिशा नाईक साकारणार खलनायिका

येड लागलं प्रेमाचं मालिकेत अतिशा नाईक साकारणार खलनायिका

18 second read
0
0
113

no images were found

 येड लागलं प्रेमाचं मालिकेत अतिशा नाईक साकारणार खलनायिका

 

२७ मे पासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका येड लागलं प्रेमाचं. पंढरपुरच्या मातीत रंगलेली रांगडी प्रेम कहाणी अभुनवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. उत्कंठावर्धक कथानकासोबतच दिग्गज कलाकारांची फौज या मालिकेची आणखी एक जमेची बाजू. सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक या मालिकेतून खलनायिकेच्या रुपात भेटीला येतील. शशीकला असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून  कोणाचही भलं झालेलं तिला आवडत नाही. प्रत्येकाबद्दलच तिच्या मनात एक असूया आहे. अभिनेत्री होण्याचं शशीकलाचं स्वप्न होतं. मात्र हे स्वप्न अधुरच राहिलं. त्यामुळे नटण्याची तिला प्रचंड आवड आहे.

स्वार्थी, अप्पलपोटी आणि पैशांचा माज दाखवणारी अशी ही शशीकला साकारताना अभिनेत्री म्हणून कस लागत आहे अशी भावना अतिशा नाईक यांनी व्यक्त केली. या भूमिकेबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, मी आजवर अनेक खलनायिका साकारल्या. मात्र शशीकलाची बातच न्यारी आहे. तिची घरात प्रचंड दहशत आहे. तिच्या पेहरावातून, चालण्यातून, बोलण्यातून याची कल्पना येते. मला खात्री आहे शशीकलाचा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच भावेल. शशीकलाच्या दागिन्यांची, तिच्या साड्यांची नक्कीच चर्चा रंगेल. शशीकलाचा मालिकेतली मुख्य नायिका म्हणजेच मंजिरीवर विशेष राग आहे. मंजिरी या घरात नसती तर एव्हाना शशीकलाने संपूर्ण घर आपल्या नावावर करुन घेतलं असतं. मंजिरीच्या सुरळीत होणाऱ्या गोष्टींमधे अडचणी आणून त्या कुटुंबाची कोंडी करायची हे काम शशीकला नेटानं करत असते. शशीकलाचे डाव यशस्वी होतात का हे पहायचं असेल तर नक्की पहा आमची नवी मालिका येड लागलं प्रेमाचं २७ मे पासून रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार कोल्हा…