
no images were found
मुलांमधील ‘अंथरूण ओले करण्याच्या’ समस्येबाबत
डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मंगळवारी मार्गदर्शन
कोल्हापूर (प्रतिनिधी):- डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे लहान मुलांमधील ‘अंथरूण ओले करण्याच्या’ अर्थात बेड वेटिंग समस्येबाबत मार्गदर्शपर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक बेड वेटिंग दिनानिमित्त मंगळवार दिनांक 27 मे रोजी हे विशेष शिबीर होणार आहे.
अंथरूण ओले करणे ही बालवयातील समस्या आहे. लघवीवर नियंत्रण नसल्याने रात्री मुले बिछाना ओला करतात. अनेकदा मुले याबद्दल अनभिज्ञ असतात व सकाळी उठल्यावरच त्यांच्या लक्षात येते. अनेक बालकामध्ये ही समस्या दिसून येते. मात्र यावर उघडपणे बोलले जात नाही. बऱ्याचदा अशा मुलांना दोष दिला जातो. त्यामुळे त्यांच्या मनोबलावरही परिणाम होऊ शकतो.
या समस्येमधून मुलांना लवकर बाहेर काढण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मुलांना व त्यांच्या पालकांना याबाबत योग्य माहिती देऊन, समुपदेशन करून आणि काही उपायांनी या अवस्थेतून लवकर बाहेर काढणे शक्य आहे. लहान मुलामधील ही समस्या दूर करण्यासाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या बालरोग विभाग व मूत्ररोग (युरोलॉजी) विभागाच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळावर दि. 27 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या कालावधीत हे मार्गदर्शन शिबीर होणार आहे. यामध्ये तज्ञ युरोलॉजीस्टकडून मार्गदर्शन केले जाणार असून गरजू पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.