
no images were found
शिवाजी विद्यापीठात २४ पासून तिसरे राज्यस्तरीय अक्षर संमेलन; ३०० कलाकार होणार सहभागी
कोल्हापूर (प्रतिनिधी): “माझी शाळा माझा फळा” समूह आणि शिवाजी विद्यापीठाचा संगीत व नाट्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २४ ते २६ मे या कालावधीत महाराष्ट्रातील कलाकारांचे तिसरे राज्यस्तरीय अक्षर संमेलन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट हे संमेलनाध्यक्ष
आहेत. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागामध्ये होणाऱ्या या संमेलनात महाराष्ट्रासह अन्य राज्यांतीलही अनेक कलाकार व कलाप्रेमी शिक्षक सहभागी होत आहेत. या संमेलनातील विविध कलाविष्कारांचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अक्षरमित्र संयोजक अमित भोरकडे, स्वागताध्यक्ष सतीश
उपळावीकर आणि संगीत व नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी केले आहे. येत्या शुक्रवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी संजय शेलार (ज्येष्ठ चित्रकार, कोल्हापूर), शुभम गायकवाड (मुख्याधिकारी वर्ग–१, मनपा आयुक्त), नरेंद्र महाडिक (होप फौंडेशन, महाड) व सर्व ज्येष्ठ अक्षरमित्र सहभागी होतील. दुपारी ३.०० वाजता कलेतून व्यवसायनिर्मिती या विषयावर परिसंवाद होईल. सायंकाळी ५.०० वाजता गालीचा व अक्षर रांगोळी उपक्रम होईल. यात गणेश माने (पुणे), तेजस लोखंडे (मुंबई ), प्रतिक पानसरे (पुणे), अमित भोरकडे (सोलापूर), गणेश तुपे (पुणे ) सहभागी होतील. रात्री ९.०० वाजता संगीत मैफील होईल. यामध्ये ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा फेम’ कु. श्रीमयी सुर्यवंशी सादरीकरण करतील.
शनिवारी (दि.२५) सकाळी ९.०० वाजता फलक लेखन व व्यक्तीचित्र रेखाटन प्रात्यक्षिक होईल. यात महेश निर्मलेन (कोल्हापूर), अतुल गायकवाड (बारामती ), सुनील सुर्यवंशी (मुंबई), वसंत अकोलकर (अमरावती) सहभागी होतील. सकाळी १०.०० वा डीजीटल कॅलिग्राफी सादरीकरणात ज्येष्ठ सचिन गडाख (नाशिक), अमित भोरकडे (सोलापूर) तर पेन्सिल व ब्रश कॅलिग्राफीत ज्येष्ठ सुलेखनकार अनिल गोवळकर (मुंबई) सहभागी होतील. सकाळी ११.०० वा. ‘माझी कला आणि मी’ या विषयावर हेमंत घरत (मुंबई), राजेंद्र हंकारे (कोल्हापूर), सचिन सावंत (मुंबई), श्रीकांत गवांडे (मुंबई), ऋषिकेश उपळावीकर (सातारा) अशांत मोरे (कोल्हापूर) सादरीकरण करतील. दुपारी ३.३० वाजता छत्रीवरील सुलेखनाची प्रात्यक्षिके सतीश उपळावीकर (कराड), मोहन कांबळे (कोल्हापूर), दिपक गोंधळे (अहमदनगर), महेंद्र शिरोडकर (गोवा) सादर करतील. दुपारी ४.३० वाजता लेखन साहित्य खरेदी – विक्री आयोजित केली आहे. सायं. ५.३० वाजता इंटरनॅशनल पेन प्रदर्शनास भेट देण्यात येईल. रात्री ९.०० वाजता संगीत
व नाट्यशास्त्र विभागातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल. रविवारी (दि .२६) सकाळी ७ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर
हॅप्पी आर्ट मॉर्निगमध्ये वैयक्तिक कलेचे सादरीकरण होईल. सकाळी ९.०० वा. भागवत सपकाळे (मुंबई), बबन माने, विजय टिपुगडे, अभिजीत कांबळे, विजय उपाध्ये (सर्व कोल्हापूर) या कलाकारांचे निसर्गचित्र प्रात्यक्षिक होईल. दु. ३ वाजता अक्षर सन्मान सोहळ्याने संमेलनाची सांगता होईल. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) डी. टी.
शिर्के यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार असून या प्रसंगी व्यंकटेश भट (सहसचिव, गृहविभाग, मंत्रालय (मुंबई), कैलास बिलोणीकर (सहसचिव, मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय), संजय इंगळे (सहसचिव, महसूल व वन विभाग, महाराष्ट्र राज्य), अमोल येडगे (भा. प्र. से., जिल्हाधिकारी, कोल्हापूर), डॉ. आर. आर. कुंभार (प्राचार्य , विवेकानंद
कॉलेज , कोल्हापूर) आदी उपस्थित राहणार आहेत.