Home क्राईम द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण, गाडीतील एक कोटी दहा लाख रुपये लंपास

द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण, गाडीतील एक कोटी दहा लाख रुपये लंपास

3 second read
0
0
168

no images were found

द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण, गाडीतील एक कोटी दहा लाख रुपये लंपास

सांगली :  जिल्ह्यातील तासगावमध्ये सहा ते सात जणांनी द्राक्ष व्यापाऱ्याच्या स्कॉर्पिओ गाडीच्या आडवी गाडी लावत गाडीतील एक कोटी दहा लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याच्या घटना घडली आहे.

तासगाव-सांगली रोडवरील तासगाव हद्दीतील गणेश कॉलनी इथे अंधाराचा फायदा घेत स्कॉर्पिओ गाडी अडवून, द्राक्ष व्यापारी आणि इतर दोघांना मारहाण करुन आरोपींनी कोट्यवधी रुपये लुटून नेले. तासगावातील गणेश कॉलनी इथल्या एका रो हाऊसमध्ये नाशिक इथले द्राक्ष व्यापारी महेश शितलदास केवलानी भाड्याने राहत आहेत. तासगाव शहरासह तालुक्यातील द्राक्ष गेल्या चार ते पाच वर्षापासून ते खरेदी करत आहेत, ही द्राक्षे ते बांगलादेश इथे पाठवतात. यावर्षीही ते द्राक्ष खरेदी करुन दरवर्षाप्रमाणे पाठवत आहेत. याच द्राक्षाचे पैसे आणण्यासाठी ते स्कॉर्पिओ गाडीतून चालक आणि दिवाणजीसह सांगली इथे गेले होते. पैसे घेऊन ते गणेश कॉलनीकडे येत होते. सायंकाळी सातच्या दरम्यान गणेश कॉलनी इथल्या रोडवर ते आले असता लाईट गेल्याने अंधार असतानाच त्यांची गाडी आठ ते दहा  अज्ञातांनी अडवली. यावेळी अज्ञातांपैकी एकाने स्कॉर्पिओ चालकास कशाचा तरी धाक दाखवून रोखले तर इतरांनी मागे बसलेल्या संबंधित द्राक्ष व्यापारी आणि दिवाणजी यांना गाडीतून खाली घेऊन मारहाण केली. याचवेळी त्या व्यापाऱ्याच्या जवळ असलेली पैशांची बॅग आपल्याकडे खेचून घेतली आणि त्यातील पैसे घेतले.  यापैकी निम्मे लोक एका दिशेने आणि निम्मे लोक एका दिशेने निघून गेल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर द्राक्ष व्यापाऱ्याने गणेश कॉलनी इथल्या काही लोकांच्या उपस्थितीत द्राक्ष व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख तसेच पोलीस पथकाने  घटनास्थळी भेट देत तपास सुरु केला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…