no images were found
पिसाळलेल्या कोल्ह्याचा आईवर हल्ला; लेकीने वाचवले प्राण
सांगली : जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कोगनोळी येथील आटपाडकर वस्ती येथील महिलेवर पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला केल्याची घटना घडली.यामध्ये सुरेखा लिंगाप्पा चौरे ही महिला जखमी झाली. या भयानक हल्ल्यावेळी तिथे असलेल्या कविताने थेट पिसाळलेल्या कोल्ह्याचा गळाच आवळून धरून केलेले धाडस यामुळे त्या कविताच्या धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे.
सुरेखा आपल्या मुलीसह पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास फिरत असताना अचानक एक पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला केला. त्यात तिच्या हाताची बोटे धरले. यावेळी आपल्या आईला वाचविण्यासाठी मुलगी कविताने दोन्ही हाताने कोल्ह्याचा गळाच आवळून धरला, त्यावेळी आईने कोल्ह्याच्या तोंडातील बोट सोडूउन घेतले व बाजूला पडलेले दगड व काठी घेऊन कोल्ह्यावर उगारली. त्याचवेळी मुलीने कोल्ह्याचा आवळलेला गळा सोडून दिला. या हल्ल्यामुळे सुरेखा चौरे यांनी आरडाओरड केल्याने तेथील ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेऊन सुरेखा चौरे यांना जखमी अवस्थेत तत्काळ उपचारासाठी सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविले. पिसाळलेल्या कोल्ह्याचा मानवी वस्तीत वावर आणि महिलेवर हल्ला यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.