Home निवड एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षपदी राजीव कुमार

एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षपदी राजीव कुमार

0 second read
0
0
6

no images were found

एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षपदी राजीव कुमार

मुंबई : एचडीएफसी बँकेने माजी वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांची अंशकालीन बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. बँकेच्या संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत या नियुक्तीला मंजुरी दिली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीनंतर तसेच भागधारकांच्या संमतीनंतर ही नियुक्ती प्रभावी होणार आहे.राजीव कुमार यांची जून २०२६ पासून चार वर्षांच्या कालावधीसाठी अतिरिक्त (स्वतंत्र) संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी अंशकालीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती होणार असून ती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीच्या अधीन असेल. तसेच, स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्तीसाठी भागधारकांची मंजुरीही आवश्यक असेल, असे बँकेने सांगितले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निवड
Comments are closed.

Check Also

१२ वी PCB नंतरच्या करिअर संधीबाबत रविवारी कदमवाडी येथे मार्गदर्शन सेमिनार

१२ वी PCB नंतरच्या करिअर संधीबाबत रविवारी कदमवाडी येथे मार्गदर्शन सेमिनार :डी. वाय. पाटील …