Home सामाजिक केशवराव भोसले नाट्यगृह लोकार्पणाच्या तयारीला वेग, रंगकर्मींच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय

केशवराव भोसले नाट्यगृह लोकार्पणाच्या तयारीला वेग, रंगकर्मींच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय

24 second read
0
0
8

no images were found

केशवराव भोसले नाट्यगृह लोकार्पणाच्या तयारीला वेगरंगकर्मींच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय

कोल्हापूर,  : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी सुकाणू समितीच्या बैठकीनंतर आज महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली रंगकर्मी, हेरिटेज समितीचे प्रतिनिधी, नाट्यकर्मी व विविध कलाकारांची आढावा बैठक पार पडली. बैठकीत रंगकर्मींनी मांडलेल्या सुमारे 90 टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या असून उर्वरित मागण्या लेखी स्वरूपात सादर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या. या बैठकीत रंगकर्मींनी नाट्यगृहातील विविध सुविधांबाबत सूचना व मागण्या मांडल्या. यापैकी ज्या बाबींमध्ये तात्काळ दुरुस्ती करणे शक्य आहे, त्या तत्काळ पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी दिले.

            यावेळी हेरिटेज समितीच्या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. प्रत्यक्ष स्थळावर आवश्यक असलेल्या काही बाबींबाबतच्या मागण्या हेरिटेज समितीच्या अध्यक्षांनी महापौरांकडे सादर केल्या. या बैठकीत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी येत्या 9 ऑगस्ट 2026 रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून सर्व तयारी सुरू असल्याची माहिती दिली. तसेच लोकार्पणापूर्वी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

            यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, उपसभापती सौ.दिपा ठाणेकर, प्रभाग समिती सभापती अनुराधा खेडकर, सभागृह नेता मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेते आदिल फरास, नगरसेवक जयंत पाटील, विजयसिंह खाडे-पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, अनुराधा वांडरे, हेरिटेज कमिटीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर, सदस्य प्रशांत हडकर, संदीप दिघे, स्ट्रक्चरल कन्सलटंट चेतन रायकर, राजेश यादव, जगदीश सुतार, गोदरेज ॲण्ड बॉईज कंपनीचे महेश पांचाळ, हर्षद कोगनोळे, रंगकर्मी रोहन घोरपडे, सुनिल घोरपडे, किरणसिंह चव्हाण, नितीन शेनेज, विलास डोळस आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

१२ वी PCB नंतरच्या करिअर संधीबाबत रविवारी कदमवाडी येथे मार्गदर्शन सेमिनार

१२ वी PCB नंतरच्या करिअर संधीबाबत रविवारी कदमवाडी येथे मार्गदर्शन सेमिनार :डी. वाय. पाटील …