Home Uncategorized सीपीआर नूतनीकरण वास्तूचे मे अखेरीस मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन होणार – मंत्री हसन मुश्रीफ

सीपीआर नूतनीकरण वास्तूचे मे अखेरीस मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन होणार – मंत्री हसन मुश्रीफ

5 second read
0
0
14

no images were found

सीपीआर नूतनीकरण वास्तूचे मे अखेरीस मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन होणार – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर  : छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय अर्थात – ‘ कोल्हापूरचा श्वास ‘ या नुतणीकरण वास्तूचे लोकार्पण येत्या मे अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली .
    शेंडा पार्क येथील सभागृहात मंत्री हसन मुश्रीफ यांनी विविध विभागाचा आज आढावा घेतला. ते म्हणाले ,सीपीआर रुग्णालय हे जनतेच्या सेवेसाठी नवीन अत्याधुनिक व देखण्या स्वरूपात सुरू होत आहे . मुख्यमंत्री महोदयांची तारीख मिळाल्यानंतर याचे उद्घाटन करण्यात येईल. शेंडा पार्क येथे सुरू असलेले 125 निवासी स्त्री / पुरुष डॉक्टरांचे निवासी वसतीगृह , प्रत्येकी 150 मुला / मुलींचे वसतीगृह, बॅडमिंटन व टेबल टेनिस कोर्ट, विश्रामगृह नूतनीकरण त्याचबरोबर MBBS चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जुन्या वसतिगृहाचे नूतनीकरण तसेच 150 नर्सिंग क्षमता असलेल्या होस्टेल व प्रशिक्षण केंद्राचा आढावा घेऊन हे काम येत्या डिसेंबरअखेर पूर्ण होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला.सध्या कागल,उत्तुर, शेंडा पार्क त्याचबरोबर इतर ठिकाणी सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये पाणी ,रस्ता , वीज त्याचबरोबर एसटीपीची (सिव्हेज ट्रिटमेंट प्लॅन्ट) कामे प्राधान्य करण्यात यावी असे निर्देश दिले .
श्री मुश्रीफ यांनी यावेळी,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क,सीपीआर रुग्णालय , सांगाव येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुरल ट्रेनिंग सेंटर तसेच उत्तुर येथे उभारण्यात येत असलेले योग व निसर्गोपचार महाविद्यालय आणि पिंपळगाव येथे सुरू असलेल्या शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालयाचा सविस्तर आढावा या बैठकीत घेतला .
      याप्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सदानंद भिसे ,डॉ . गिरीश कांबळे , वैद्यकीय अध्यक्ष डॉ . शिशिर मिरगुंडे , प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप , योग व निसर्गोपचार महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ भाग्यश्री खोत, मनपाचे जल अभियंता हर्षदीप घाटगे ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी – कंत्राटदार उपस्थित होते .

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

शाहूपुरी पोलीस ठाण्यात मौखिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

शाहूपुरी पोलीस ठाण्यात मौखिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न कोल्हापूर, : ३१ मे जागतिक तंबाखू व…