no images were found
स्वच्छता मोहिमेत 15 टण प्लॅस्टिक, तणकट व खरमाती उठाव
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने शहरातील विविध ठिकाणी आज सकाळी 7 वाजल्यापासून स्वच्छता मोहिम अभियान राबविण्यात आली. हि स्वच्छता मोहिम महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत 15 टण खरमाती, स्वच्छता करुन कचरा प्लॅस्टिक, तणकट व इतर कचरा गोळा करण्यात आला.
हि स्वच्छता मोहिम माऊली पुतळा ते जवाहरनगर रोड, माऊली पुतळा ते सायबर चौक ते एनसीसी भवन या परिसरात या परिसरात राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत मुख्य रस्ते, फुटपाथ, डिव्हाईटरची स्वच्छता, प्लास्टिक व कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेसाठी 2 आयवा डंपर, 2 ट्रॅक्टर 1 जेसीबी वापर करण्यात आला.
या मोहिमेत नगरसेवक अभिजीत मोकाशी, उमेश पोवार, नगरसेविका सौ.पूजा पोवार, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी, ईस्माइल बागवान, सतीश पोवार, आरोग्य निरिक्षक दिलीप पाटणकर, महापालिका आरोग्य विभागाचे 30 कर्मचारी व नागरीकांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.