no images were found
श्री गणेशा आरोग्याचा 2.0’ अंतर्गत 1 हजार 88 आरोग्य शिबिरे
कोल्हापूर, : ‘श्री गणेशा आरोग्याचा 2.0’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात 14 ते 22 सप्टेंबर या कालावधीत एकूण 1 हजार 88 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांचा 53 हजार 967 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
या शिबिरांमध्ये 36 हजार 90 पुरुष, 25 हजार 613 महिला तर 5 हजार 382 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हृदयविकार असलेल्या 2 हजार 465 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच कायचिकित्सा विभागात 24 हजार 462, शल्यतंत्र विभागात 504, अस्थिविकार विभागात 1 हजार 642, बालरोग विभागात 2 हजार, स्त्रीरोग विभागात 1 हजार 162, कान-नाक-घसा विभागात 928, नेत्रविकार विभागात 1 हजार 637, त्वचाविकार विभागात 891 आणि इतर विकार व व्याधींसाठी 1 हजार 916 रुग्णांनी उपचार व तपासणीचा लाभ घेतला.
या उपक्रमांतर्गत आयुष्मान भारत व आभा कार्ड सुमारे 4 हजार 61 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली, तर 1 हजार 947 जणांना गोल्डन कार्डचा लाभ देण्यात आला. रक्तदान शिबिरांमध्ये 1 हजार 991 इतक्या रक्तदात्यांनी सहभाग घेतला. तसेच 6 हजार 315 रुग्णांची रक्त तपासणी, 1 हजार 380 रुग्णांची ईसीजी तपासणी करण्यात आली. एंजिओग्राफी व इतर तपासण्यांसाठी 268 रुग्ण आले. विशेष म्हणजे या उपक्रमात अवयवदानासाठी 187 जणांनी लिखित संमतीपत्र दिले, तर 262 रुग्णांना पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयात पाठविण्यात आले.