no images were found
पश्चिम बंगाल सह आसाम आणि पुद्दूचेरी या ठिकाणी भाजपाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने आनंदोत्सव :
विकसित भारताच्या दिशेने भाजपाचे भरीव योगदान – खासदार धनंजय महाडिक
कोल्हापूर : पश्चिम बंगालसह आसाम आणि पुद्दूचेरी या ठिकाणी भाजपाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ढोल ताशांच्या गजरात ठेका धरत फटाक्यांची आतषबाजी तसेच एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी देश का नेता कैसा हो… नरेंद्र मोदी जैसा हो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा दिल्या.
यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, हा विजय केवळ पक्ष म्हणून नाही, तर सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकासाभिमुख धोरणांचा विजय आहे. पश्चिम बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जी यांच्या दडपशाही आणि एकाधिकारशाहीला सुरुंग लावला आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या मदतीने आजवर तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील सत्तेचा दुरुपयोग केला. मात्र देशाचे कणखर गृहमंत्री अमितजी शहा यांनी पश्चिम बंगालच्या दहशतमुक्तीसाठी खंबीर पावले उचलली. त्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होऊन भाजपला संपूर्ण जनाधार मिळाला. जनतेने भाजपवर दाखवलेला विश्वास हा पक्षाच्या संघटनात्मक बळकटीचा आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांचा परिणाम आहे. भारतीय नागरिकांचा भाजपच्या सकारात्मक आणि विकासात्मक ध्येयधोरणांवर पूर्ण विश्वास आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आपल्या मनोगतात विजयाचे श्रेय भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना दिले. पश्चिम बंगाल आणि आसाममधील विजयाने हे सिद्ध केले आहे की, जनतेला आता केवळ विकास आणि सुशासन हवे आहे. भाजप या दोन्ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपचा विस्तार होत असून, ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावत आहे. याप्रसंगी भाजपा माजी प्रदेश सचिव महेश जाधव, राहुल चिकोडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी धनंजय महाडिक, विजय जाधव, महेश जाधव, राहूल चिकोडे, शिवाजी बुवा, अमर साठे, हेमंत आराध्ये, भरत काळे, संतोष लाड, विजय अगारवाल, गणेश देसाई, शौलेश पाटील, गिरीश साळोखे, अतुल चव्हाण, दिग्विजय कालेकर, अजित सूर्यवंशी, दीपक काटकर, संतोष भिवटे, सयाजी आळवेकर, प्रदीप उलपे, राजसिंह शेळके, नगरसेवक रेखा उगवे, माधुरी व्हटकर, माधुरी नकाते, अर्चना कोराणे, विशाल शिराळे, विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे-पाटील, किरण नकाते, विश्वजित पवार, महेश यादव, धीरज पाटील, सचिन कुलकर्णी, सुनील पाटील, अशोक लोहार, सतीश आंबर्डेकर, संभाजी शिंदे, राकेश गुंदेशा, सचिन पोवार, प्रसाद जाधव, संग्राम जरग, अवधूत भाट्ये, शेखर जाधव, सुधीर बोळावे, अमेय भालकर, ओंकार गोसावी, दिलीप बोंद्रे, भूषण कानकेकर, वल्लभ देसाई, गौरव सातपुते, रोहित कारंडे, प्रसाद पाटोळे, विवेक कोरडे, प्रशांत बारड, अनिकेत अतिग्रे, उमा पोवार, रेणू खुपेकर, सुषमा माजगांवकर, विशाखा कलशेट्टी, विजय कामत, विनायक कदम, निवास देसाई, अमर जत्राटे, सुमित पारखे, अभिषेक भोसले, किरण कुलकर्णी, प्रवीणचंद्र शिंदे, समर्थ चिले, सुहास सदलगे, सागर रांगोळे, नितीन पोवार, निवास देसाई यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.