Home राजकीय कोल्हापूरचा कायापालट करण्यास महायुती सरकार समर्थ : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूरचा कायापालट करण्यास महायुती सरकार समर्थ : आमदार राजेश क्षीरसागर

0 second read
0
0
12

no images were found

कोल्हापूरचा कायापालट करण्यास महायुती सरकार समर्थ : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर  : कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध महत्त्वाच्या विकासकामांना गती देण्यात येत आहे. गेल्या साडेचार वर्षाच्या कालावधीत कोल्हापूर शहरात अनेक लोकहितोपयोगी प्रकल्प राबवले जात आहेत. ही विकासकामे पूर्णत्वास आली असून, त्याचे दि.०९ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते लोकार्पण होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले कि, विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाकडे आणि अपप्रचाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून, महायुती सरकार आपल्या गतिमान निर्णय पद्धतीद्वारे कोल्हापूरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आणि समर्थ आहे, कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावत जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार वेगाने पावले उचलत आहे. गेल्या काही काळापासून विरोधकांकडून विकासकामांमध्ये अडथळे आणण्याचे आणि नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या राजकारणाला बाजूला सारत जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यावर महायुती सरकारने आपले लक्ष केंद्रित केले आहे. पायाभूत सुविधांचा विकास, औद्योगिक प्रगती, पर्यटन वाढ आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन पातळीवर तातडीने निर्णय घेतले जात आहेत.
कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. प्रशासकीय पातळीवरील निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान केल्यामुळे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळाली आहे. महायुती सरकार कोल्हापूरचा कायापालट करूनच जनतेला दिलासा देईल, असा विश्वासही आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

*महायुती सरकारच काम बोलतंय..!!*
• कोल्हापूर – सांगली पूरनियंत्रण प्रकल्पासाठी रु.३,२०० कोटी.
• श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी रु.१४४५.९७ कोटी.
• संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह इमारत नुतनीकरण रु.२५.१० कोटी.
• मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम विकसित करणे रु.६.९६ कोटी.
• दुधाळी सांडपाणी प्रकल्प रु.१२.०० कोटी
• श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा अंतर्गत बहुमजली पार्किग इमारत रु.३९.८० कोटी.
• हॉटेल गोकुळ येथील मल्टीलेव्हल कार पार्किंग रु.४.५० कोटी.
• राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे समाधीस्थळ विकसित करणे रु.९.४० कोटी.
• रंकाळा तलाव येथे म्युझिकल फौंऊटेन उभारणे रु.५ कोटी.
• शहराअंतर्गत रु.१०० कोटींचे प्रमुख रस्ते.
• कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत ५३० रोजंदारी कर्मचारी आणि के.एम.टी.च्या १५९ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले.
• कोल्हापूरवासीयांच्या माथी मारलेले टोलचे पैसे ओवाळणी करून महायुती शासनानेच भागविले.
• कोल्हापूर शहरात आय.टी.पार्क मंजुरी.
• मे.उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच.
• आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर
• कोल्हापूर विमानतळ सुशोभिकरण व कार्यानिव्त करणे.
• कोल्हापूर रेल्वेस्थानक सुशोभिकरण करणे.
• आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणे.
• सारथी संस्थेचे भव्य उपकेंद्र व इमारत उभारणी.

*आगामी काळातील विकासाचा अजेंडा..!!*
• कोल्हापूर शहराची हद्दवाढ.
• शक्तीपीठ महामार्ग.
• छत्रपती शाहू मिल्स येथे राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक.
• आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम व अॅकॅडमी स्थापना.
• शिवाजी पूल ते तावडे हॉटेल ओव्हर ब्रिज उभारणे.
• शहर प्रवेशासाठी बास्केट ब्रिज उभारणे.
• शहराअंतर्गत रिंगरोड, ओव्हर ब्रिज, भुयारी मार्ग निर्माण करणे.
• शहरात पार्किंग व्यवस्था निर्माण करणे.
• राजाराम बंधाऱ्यास नवीन पर्यायी पुलाचे बांधकाम करणे.
• शेत पाणंदया विकसित करणे.
कोल्हापूर शहराचा आगामी काळात नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी आपण पूर्णपणे कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

यादें ने साजरा केला 100 एपिसोड्सचा टप्पा

यादें ने साजरा केला 100 एपिसोड्सचा टप्पा सोनी सबचा हृदयस्पर्शी ड्रामा यादें ने 100 एपिसोड्…