
no images were found
आजादी का अमृत महोत्सव निमित्त रेल्वे विभागाकडून रॅलीचे आयोजन
कोल्हापूर, दि. 3 : 15 ऑगस्ट 2022 रोजी भारतला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आजादी का अमृत महोत्सव दिनांक 01 जुलै पासून साजरा करण्यात येत आहे. कोल्हापूर निरीक्षक आरपीएफ विजय शंकर मांझी यांच्यावतीने 1 जुलै रोजी शहरामध्ये दोन चाकी व चार चाकीची रॅली काढून आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी पुणे विभागाचे सहायक विभागीय अभियंता आर. के. यादव, कोल्हापूरचे स्टेशन अधीक्षक विजय कुमार, स.उप निरी विजय पार्टे, आरपीएफ चे कर्मचारी संजय कांबळे, रमेश टोमके, शरद कांबळे, शिवाजी नरुटे, एल. टी. गुरव, डी. बी. पाटील आदी तसेच 1098 चाइल्ड हेल्प लाइन चे पुरुष व महिला कर्मचारी उपस्थित होते.