Home शासकीय महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

0 second read
0
0
7

no images were found

महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार शिवाजी पाटील, महापौर रूपराणी निकम, जैन अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह अन्य मान्यवर तसेच स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीतानंतर पोलीस वाद्यवृंद पथकाकडून महाराष्ट्र राज्यगीत धूनचे वादन करण्यात आले. तसेच राष्ट्रध्वजाला पोलीस संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. यावेळी विविध विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हस्ते गौरविण्यात आले. पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, मान्यवर व्यक्ती, नागरिक, विद्यार्थी, पालक व पत्रकार यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच जिल्हावासियांना उद्देशून भाषण केले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

विकसित महाराष्ट्र-2047 कडे राज्याची वेगवान वाटचाल;1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा संकल्प – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विकसित महाराष्ट्र-2047 कडे राज्याची वेगवान वाटचाल;1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा संकल्प …