Home Video भगवान आदिनाथ तीर्थंकर यांचा महामस्तकाभिषेक सोहळा अक्षय तृतीया निमित्ताने येत्या १९ एप्रिल रोजी होणार

भगवान आदिनाथ तीर्थंकर यांचा महामस्तकाभिषेक सोहळा अक्षय तृतीया निमित्ताने येत्या १९ एप्रिल रोजी होणार

5 second read
0
0
73

no images were found

भगवान आदिनाथ तीर्थंकर यांचा महामस्तकाभिषेक सोहळा अक्षय तृतीया निमित्ताने येत्या १९ एप्रिल रोजी होणार

कोल्हापूर : येथील शुक्रवार पेठ मधील सुमारे दोन हजार वर्षापूर्वीच्या स्वस्तिश्री लक्ष्मीसेन जैन मठ या
ठिकाणी भव्य अशी २८ फूट उंचीची भगवान आदिनाथ तीर्थंकरांची मूर्ती असून प्रतिवर्षी अक्षय तृतीया या शुभ दिनी या मूर्तीवर महामस्तकाभिषेक सोहळा संपन्न होत असतो. यावर्षीचे हे ६५ वे वर्ष असून यामध्ये विविध साधारण १८ ते २० प्रकारचे अभिषेक होत असतात. या महामस्तकाभिषेक सोहळ्यास आचार्य श्री सकलकीर्तीजी महाराज व आचार्य श्री चंद्रप्रभूसागर महाराज यांच्या पावन सानिध्यात स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी यांच्या अधिनेतृत्वाखाली हा सोहळा होणार असून मुख्य यजमान पदाचा सन्मान सौ. कांचन भिवटे परिवारास मिळाला असून त्यांच्या शुभ हस्ते चंद्रप्रभू तीर्थंकर तसेच जाज्वल्य देवी ज्वाला मालिनी माता व आदिनाथ तीर्थंकर यांचे पूर्ण अभिषेक करण्याचा सन्मान या परिवारमार्फत होणार आहे. तसेच दुग्धाभिषेक, इक्षुरस (उसाच्या रसाचा), कुंकूम, हळदी, रक्तचंदन, श्वेतचंदन तसेच सर्वऔषधी नारिकेल, कषायचूर्ण, कलकचूर्ण, अष्टगंध पूर्णसुगंधित असे विविध अभिषेक होणार आहेत. यानंतर शांतीधार होऊन पुष्प वृष्टी करण्यात येणार आहे. अशी माहिती
स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
प्रतिवर्षीप्रमाणे मठामार्फत देण्यात येणारा या वर्षीचा आदर्श दांपत्य पुरस्कार सौ. किशोरी व प्रकाश आवाडे यांना देण्यात येणार आहे. सकाळी ठीक ७.३० वाजता ध्वजारोहण होऊन मुख्य पूजा विधी सुरुवात होईल. यानंतर मंदिरातील सर्व मूर्तीवर पंचामृत अभिषेक करण्यात येणार असून त्यानंतर दुपारच्या सत्रात स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामी यांचा पट्टाभिषेक वर्धापन दिन संपन्न होणार आहे. यानंतर सायंकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील व शहरातील सर्व खासदार आमदार तसेच नगरसेवक व मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित केला असून या कार्यक्रमानंतर मुख्य महामस्तकाभिषेक सोहळ्यात सुरुवात होईल. यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, अशोकराव माने, राजेंद्र पाटील यड्रावकर, राजेश क्षीरसागर, सतेज उर्फ बंटी पाटील, राहुल आवाडे, महापौर सौ. रूपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक राजू लाटकर, रत्नेश शिरोळकर, प्रतापसिंह जाधव, दीपा काटकर, दीपा ठाणेकर, प्रतिज्ञा उत्तुरे, माधवी गवंडी व भागातील सर्व नगरसेवक उपस्थित असणार आहेत. सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी स्वस्तीश्री लक्ष्मीसेन महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे बाबुराव मगदूम, सुरेश रोटे, जे. बी. पाटील, संजय आडके, महावीर मगदूम, सुरज माणगावकर, सुरेश मगदूम, अतुल होनोले, विशाल शेटे, व शहरातील सर्व जिन मंदिरांचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि ज्वाला मालिनी महिला मंडळ सह शहरातील सर्व महिला मंडळ यांचे वतीने हे संपन्न होत आहे. पत्रकार परिषदेस बाबुराव मगदूम, सुरेश रोटे, जे. बी. पाटील, संजय आडके, महावीर मगदूम, सुरज माणगावकर, सुरेश मगदूम, अतुल होनोले, विशाल शेटे, आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…