no images were found
एपीएसईजेडने सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी भारतातील पहिली “पोर्ट ऑफ रिफ्यूज” सुविधा सुरू केली
- अदाणी पोर्ट्स आणि स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईजेड) ने भारतातील पहिले “पोर्ट ऑफ रिफ्यूज” सुरू केले आहे, हे सागरी आपत्कालीन परिस्थितीत जहाजांना आश्रय देण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
- एसएमआयटी सॅल्व्हेज (रॉयल बॉस्कलिस वेस्टमिन्स्टर एनव्हीच्या आपत्कालीन आणि सेव्हलाज विभाग) आणि मेरिटाइम इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर (MERC) यांच्यासोबत केलेल्या सामंजस्य करारामुळे (MoU) जागतिक दर्जाचे तांत्रिक कौशल्य आणि जलद प्रतिसाद क्षमता मिळणार आहे.
- हा उपक्रम आंतरराष्ट्रीय सागरी नियमांनुसार आहे. त्यामुळे सागरी सुरक्षा वाढेल, पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि जागतिक सागरी व्यापारात भारताची भूमिका अधिक मजबूत होईल.
अहमदाबाद, : अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईजेड) ही भारतातील सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी एकात्मिक वाहतूक सेवा कंपनी आहे. ही कंपनी देशातील बंदरांवर हाताळल्या जाणाऱ्या एकूण मालवाहतुकीपैकी सुमारे 27% माल हाताळते. एपीएसईजेडने भारतातील पहिले “पोर्ट ऑफ रिफ्यूज” (PoR) सुरू केले आहे. या उपक्रमामुळे सागरी आपत्कालीन सुविधांमध्ये दीर्घकाळापासूनची असलेली कमतरता दूर झाली आहे. तसेच, समुद्रात अडचणीत सापडलेल्या जहाजांना मदत करण्यासाठी आणि हाताळण्यासाठी एक व्यवस्थित प्रणाली तयार करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेनुसार (IMO), पोर्ट ऑफ रिफ्यूज (PoR) म्हणजे अशी निश्चित केलेली जागा जिथे जहाज आपत्कालीन परिस्थितीत आश्रय घेऊ शकतात, परिस्थिती नियंत्रणात आणू शकतात, लोकांचे जीव वाचवू शकतात आणि पर्यावरणाचे नुकसान कमी करू शकतात. अशा प्रकारची व्यवस्था मोठ्या सागरी देशांमध्ये आधीपासून आहे, पण भारतात ती औपचारिकपणे लागू झाली नव्हती. भारताची 11,000 किमीपेक्षा जास्त किनारपट्टी आणि महत्त्वाच्या जागतिक सागरी मार्गांवरील स्थान लक्षात घेऊन, आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
एपीएसईजेड दोन ठिकाणांना पोर्ट ऑफ रिफ्यूज (PoR) म्हणून निश्चित करणार आहे. पश्चिम किनाऱ्यावर असलेले दिघी पोर्ट अरबी समुद्र आणि पर्शियन आखाताकडे जाणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीसाठी मदत करेल, तर पूर्व किनाऱ्यावरचे गोपालपूर पोर्ट बंगालच्या उपसागरातील जहाजांना तसेच मलाक्का सामुद्रधुनीकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या व्यापार मार्गांवरील वाहतुकीसाठी सेवा देईल. या ठिकाणी आपत्कालीन सेवा उपलब्ध असतील, जसे की जहाज वाचवणे (सेव्हलाज), जहाजांचे अवशेष हटवणे, अग्निशमन, प्रदूषण नियंत्रण आणि आपत्कालीन समन्वय. यासाठी खास उपकरणे आणि प्रशिक्षित टीम्स तयार ठेवण्यात येतील.
हा उपक्रम एसएमआयटी साल्वेज (रॉयल बोस्कालिस वेस्टमिन्स्टर एन.व्ही. (बोस्कालिस)चा सेव्हलाज आणि आपत्कालीन प्रतिसाद विभाग) आणि मेरीटाईम इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर (एमईआरसी) यांच्यासोबत केलेल्या त्रिपक्षीय सामंजस्य करारामुळे (MoU) सुरू झाला आहे. या भागीदारीमुळे जागतिक दर्जाचे तांत्रिक कौशल्य आणि एकत्रितपणे जलद प्रतिसाद देण्याची क्षमता मिळते. ही सेवा आंतरराष्ट्रीय विमा संरक्षण (प्रोटेक्शन अँड इंडेम्निटी क्लब्स) असलेल्या जहाजांसाठीही उपयुक्त ठरेल. त्यामुळे सागरी धोका व्यवस्थापन आणि जबाबदारीच्या जागतिक नियमांनुसार काम करणे अधिक सोपे होईल.
भारताची सागरी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे,” असे एपीएसईझेडचे पूर्ण-वेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. अश्वनी गुप्ता म्हणाले. “बंदर अर्थव्यवस्थेला मदत करतात, पण ‘पोर्ट ऑफ रिफ्यूज’ जीव वाचवतात. अशा सुविधा उभारून आम्ही भारताची सागरी तयारी वाढवत आहोत आणि किनारपट्टी सुरक्षेत नवीन मानक तयार करत आहोत. एपीएसईजेडमध्ये आम्हाला वाटते की, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसोबत जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे.”
“हा उपक्रम भारताच्या सागरी तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद क्षमतेसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे,” असे शिपिंगचे महासंचालक (डीजी) श्री. श्याम जगन्नाथन, आयएएस यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “पोर्ट ऑफ रिफ्यूजसारखी व्यवस्था लागू केल्यामुळे सागरी घटनांच्या वेळी अधिक चांगला समन्वय आणि वेळेवर कृती करता येईल. त्यामुळे जीव, माल आणि किनारपट्टी पर्यावरणाचे संरक्षण अधिक प्रभावीपणे होईल. ही महत्त्वाची सुविधा सुरू करण्यासाठी सर्व संबंधितांच्या सहकार्याचे मी कौतुक करतो.”
“ज्या ठिकाणी सर्वाधिक गरज आहे, त्या ठिकाणी आम्ही सागरी सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षण मजबूत करत आहोत. यामुळे भारताची किनारपट्टी आणि समाज अधिक सुरक्षित होत आहे,” असे एसएमआयटी साल्वेजचे एमडी श्री. रिचर्ड जानसेन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “अपघातग्रस्त जहाजाला ‘पोर्ट ऑफ रिफ्यूज’ उपलब्ध करून देणे सेव्हलाज ऑपरेशनमध्ये खूप महत्त्वाचे असते. यामुळे जहाज आणि त्यातील माल जलद आणि सुरक्षितपणे हाताळता येतो. तसेच, आग विझवताना वापरलेले पाणी आणि इतर अवशेष नियमांनुसार योग्य प्रकारे प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावता येते. भारतातील महत्त्वाच्या सागरी मार्गांवर जलद, सुरक्षित आणि समन्वित आपत्कालीन प्रतिसाद देण्यासाठी आम्ही जागतिक दर्जाचे कौशल्य आणि अनुभव देण्यास तयार आहोत.”
हा उपक्रम आंतरराष्ट्रीय सागरी करारांनुसार आहे. त्यामुळे सागरी सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षण मजबूत होईल, तसेच जागतिक शिपिंग मार्गांमध्ये भारताची भूमिका अधिक बळकट होईल. औपचारिक “पोर्ट ऑफ रिफ्यूज” (PoR) प्रणाली तयार करून, एपीएसईजेड आपत्कालीन परिस्थितीत लवकर प्रतिसाद देण्याची तयारी वाढवण्याचा आणि जागतिक सागरी व्यापारात भारताचे स्थान अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.