no images were found
स्कोडा ऑटो इंडियाची ‘ग्रेटेस्ट ऑन अ ट्रॅक’ मोहीम सुरू
कोल्हापूर, : स्कोडा ऑटो इंडिया ने आपल्या परफॉर्मन्स-केंद्रित प्रवासाला अधोरेखित करणारी ‘ग्रेटेस्ट ऑन अ ट्रॅक’ (जी.ओ.ए.टी.) ही नवी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची सुरुवात विक्रमासह करण्यात आली असून, एका सर्किटवर एकाच उत्पादकाच्या वाहनांचा सर्वात वेगवान मल्टी-कार रिले पूर्ण करत कंपनीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद केली आहे.
१३० वर्षांच्या जागतिक वारशासह आणि मोटरस्पोर्टमधील १२५ वर्षांच्या इतिहासाचा गौरव करत, स्कोडाने आपल्या रेसिंग डीएनएला नव्या मोहिमेद्वारे अधिक बळकटी दिली आहे. तसेच, ब्रँडच्या प्रतिष्ठित आरएस (रॅली स्पोर्ट) बॅजच्या अर्धशतकाहून अधिक प्रवासाचाही यात गौरव करण्यात आला आहे.
या मोहिमेबद्दल बोलताना स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर Ashish Gupta म्हणाले, “प्रत्येक स्कोडा वाहन अचूकता, नियंत्रण आणि उच्च दर्जाच्या परफॉर्मन्ससाठी विकसित करण्यात आले आहे. मोटरस्पोर्ट डीएनए ही आमच्या प्रत्येक वाहनाची ओळख आहे. ‘ग्रेटेस्ट ऑन अ ट्रॅक’ मोहीम स्कोडाच्या ड्रायव्हिंग अनुभवातील अचूक स्टिअरिंग, संतुलित चेसिस, विश्वासार्ह ब्रेकिंग आणि चालक-वाहन यांच्यातील सखोल नात्याचा गौरव करते.”
जी.ओ.ए.टी मोहिमेअंतर्गत स्कोडाने कोयंबतूर ऑटोमोटिव्ह स्पोर्ट्स अँड टेक्निकल ट्रेनिंग ट्रॅकवर पाच वाहनांच्या ताफ्यासह १२:३०:९७ अशी वेळ नोंदवत विक्रम प्रस्थापित केला. पिट-लेन बदलांसह एकूण वेळेच्या आधारे हा विक्रम नोंदविण्यात आला असून, स्कोडा ऑटो इंडिया देशातील सर्वात वेगवान वाहन ताफा ठरला आहे.