Home शासकीय शेतीसाठी पाणी काटकसरीने वापरण्याचा निर्णय, तीन आठवड्याला होणार समितीची बैठक

शेतीसाठी पाणी काटकसरीने वापरण्याचा निर्णय, तीन आठवड्याला होणार समितीची बैठक

30 second read
0
0
21

no images were found

शेतीसाठी पाणी काटकसरीने वापरण्याचा निर्णय, तीन आठवड्याला होणार समितीची बैठक

          कोल्हापूर : उपसा बंदी तुर्तास नको, शेतीसाठी पाणी काटकसरीने वापरून सर्वांना मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. उर्वरीत पाणी साठा लक्षात घेवून उपसा बंदीबाबत दर तीन आठवड्याला कालवा सल्लागार समितीची बैठक घेवून पुढिल निर्णय घ्यावा असे आजच्या बैठकीत निर्णय झाला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

            यावेळी आमदार पी.एन.पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, शिल्पा मगदूम-राजे, रोहीत बांदिवडेकर, डी.डी. शिंदे यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.

            यावेळी जिल्हयातील चार मोठ्या प्रकल्पातील यात दुधगंगा, वारणा, राधानगरी व तुळशी धरणातील पाणी साठा नियोजनाबाबत चर्चा झाली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे व उपस्थित मान्यवरांचे स्वागत अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे यांनी केले. यावेळी शेवटच्या माणसांना पाणी मिळावे हा उपसा बंदीचा हेतू असून याबात पाणी साठा सुरक्षित ठेवण्यासाठी व सर्वांना आवश्यक सिंचनासाठी पाणी मिळण्यासाठी निर्णय घ्यावा लागतो असे पाटबंधारे विभागाकडून मांडण्यात आले. सद्यस्थितीत उपसा बंदी न करता, पाण्याचा वापर अपव्यय न करता चिकाटीने करण्याचा सल्ला पालकमंत्री तथा अध्यक्ष यांनी दिला. मात्र, पाणी साठ्याचा अभ्यास करून रोटेशन नुसार तीन आठवड्यांनी  ही बैठक घेवून उपसा बंदीबाबत पडताळणी करावी असेही या बैठकीत ठरले. तसेच 8 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंचनासाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीतील दुप्पट वाढीस दिलेल्या स्थगितीवर चर्चा झाली. सद्यस्थितीत निर्णयाअगोदर ज्या पद्धतीने पाणीपट्टी आली आहे त्यानूसार जुन्या दराने भरण्याचे पालकमंत्री यांनी आवाहनही केले.

            शासनाच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांनी सोलर यंत्र बसवून दिवसा पाणी वापर केल्यास पाण्याचा अपव्यय होणार नाही तसेच पैशांची बचतही होईल असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी कुंभोज येथील झालेल्या सोलर प्रकल्पाबाबत उपस्थितांनी माहिती दिली.

 

सद्यस्थितीत उपलब्ध पाणी साठा

  • दुधगंगा प्रकल्प – दुधगंगा प्रकल्पाची एकुण सिंचन क्षमता 46948 हेक्टर असून  त्यापैकी जून 2023 अखेर 36317 हेक्टर इतके क्षेत्र निर्मित झाले आहे. एकुण प्रकल्पिय पाणीवापर 27.06 टीएमसी आहे. उन्हाळी हंगामापूर्वी उपलब्ध पाणीसाठी 12.70 टीएमसी आहे. उपलब्ध पाण्याच्या नियोजनातून सिंचनासाठी असलेला पाणीसाठा हा 9 टीएमसी आहे.  यातील1.87 टीएमसी पाणी गैबी बोगद्यातून  तर दूधगंगा खोरयासाठी  6.56 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. गरज पडल्यास तुळशी प्रकल्पातील पाणी पंचगंगा नदी व भोगावती नदीसाठी वापरावे.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…