no images were found
अदाणी ग्रीन एनर्जीने जगातील सर्वात मोठी सिंगल-लोकेशन बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम सुरू केली:स्वच्छ आणि विश्वासार्ह वीज पुरवठा अधिक मजबूत होणार
अहमदाबाद, : भारतातील सर्वात मोठी नवीकरणीय ऊर्जा कंपनी असलेल्या अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड’ने (एजीईएल) एकूण 3.37 गिगावॅट-तास (GWh) क्षमतेची बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (BESS) सुरू केली आहे. चीनबाहेर एकाच ठिकाणी उभारण्यात आलेली ही जगातील सर्वात मोठी बॅटरी स्टोरेज सुविधा असून, जगातील सर्वात वेगाने पूर्ण करण्यात आलेल्या प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पात मार्च 2026 मध्ये सुरू करण्यात आलेल्या 1.37 GWh क्षमतेचा देखील समावेश आहे. यामुळे गुजरातच्या खावडा येथील एजीईएलची एकूण कार्यरत बॅटरी स्टोरेज क्षमता 3.37 GWh झाली आहे. हा प्रकल्प साइटवर काम सुरू झाल्यानंतर फक्त 10 महिन्यांत पूर्ण करण्यात आला, त्यामुळे हा जगातील सर्वात वेगाने उभारण्यात आलेल्या युटिलिटी-स्केल बॅटरी स्टोरेज प्रकल्पांपैकी एक ठरला आहे.
या प्रकल्पामुळे वीज ग्रिडची स्थिरता वाढेल, जास्त मागणीच्या वेळेत वीज पुरवठा अधिक सुधारेल आणि नवीकरणीय ऊर्जा 24 तास अखंड आणि विश्वासार्ह वीज पुरवठा देण्यासाठी सक्षम होईल. एजीईएल ने आर्थिक वर्ष 2027 मध्ये 10 गिगावॉट-तासांपेक्षा पेक्षा जास्त बॅटरी स्टोरेज क्षमता वाढवण्याची आणि पुढील पाच वर्षांत ती 50 गिगावॉट-तासांपर्यंत नेण्याची योजना आखली आहे.
अदाणी ग्रीन एनर्जीची 3.37 GWh क्षमतेची बीईएसएस (बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम) इतकी स्वच्छ ऊर्जा साठवू शकते की ती सुमारे 10 लाख घरांना एक दिवसभर वीज पुरवू शकते. यामुळे इंदूर, चंदीगड यांसारख्या शहरांची किंवा संपूर्ण गोवा राज्याची विजेची सर्वाधिक मागणी पूर्ण होऊ शकते. तसेच या प्रकल्पाद्वारे 1.2 कोटींहून अधिक एलईडी बल्ब 10 तास सतत चालू ठेवता येऊ शकतात. ही बॅटरी स्टोरेज प्रणाली एक मोठा बदल घडवणारी ठरेल, कारण यामुळे नवीकरणीय ऊर्जेवर आधारित वीज ग्रिड अधिक स्थिर राहतील आणि दिवसभर सतत हरित ऊर्जा उपलब्ध होईल.
श्री सागर अदाणी, एग्जीक्यूटिव डायरेक्टर, एजीईएल यांनी सांगितले की, “भारताच्या स्वच्छ ऊर्जा परिवर्तनाच्या पुढील टप्प्यात मोठ्या प्रमाणातील ऊर्जा साठवणूक व्यवस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नवीकरणीय ऊर्जेची क्षमता वेगाने वाढत असताना, चोवीस तास आणि विश्वासार्ह स्वच्छ वीजपुरवठा करण्यासाठी मजबूत स्टोरेज पायाभूत सुविधा गरजेची आहे. खावडा येथील 3.37 गिगावॅट-तास क्षमतेच्या बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम सुरू करून एजीईएल ने मजबूत, लवचिक आणि आवश्यकतेनुसार वीज पुरवू शकणारी ऊर्जा प्रणाली उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. बॅटरी स्टोरेज क्षेत्रातील आमची गुंतवणूक भविष्यातील गरजा लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर स्वच्छ ऊर्जा पायाभूत सुविधा उभारण्याच्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचे प्रतीक आहे.”
अदाणी ग्रीन एनर्जीचा बीईएसएस (बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम) प्रकल्प लिथियम-आयन बॅटरी तंत्रज्ञान आणि आधुनिक ऊर्जा व्यवस्थापन प्रणालींचा वापर करून तयार करण्यात आला आहे. यामुळे ऊर्जा कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि वीज ग्रिडची जलद प्रतिसाद क्षमता वाढते. हा प्रकल्प गुजरातमधील खावडा येथे धोरणात्मकदृष्ट्या उभारण्यात आला आहे. येथे एजीईएल जगातील सर्वात मोठे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प विकसित करत आहे, ज्याची क्षमता 2029 पर्यंत 30 गिगावॉट करण्याचे लक्ष्य आहे, त्यापैकी 9.9 गिगावॉट क्षमता आधीच कार्यान्वित झाली आहे.
जगभरात नवीकरणीय ऊर्जेचा वापर वेगाने वाढत असताना, मोठ्या प्रमाणातील बॅटरी स्टोरेज ही विश्वासार्ह आणि सतत वीज पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची पायाभूत सुविधा बनत आहे. नवीकरणीय ऊर्जेचे उत्पादन वेळ, हवामान, ऋतू आणि ठिकाणानुसार बदलत असते. ही अस्थिरता कमी करण्यासाठी बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम अतिरिक्त ऊर्जा साठवते आणि मागणी जास्त असताना तिचा पुरवठा करते.
एजीईएल चा हा प्रकल्प दाखवून देतो की नवीकरणीय ऊर्जा आता केवळ बदलत्या स्वरूपाची नसून ती मोठ्या प्रमाणावर स्थिर, विश्वासार्ह आणि मागणीनुसार पुरवता येणारी वीज प्रणाली बनू शकते.