Home Uncategorized डॉ.जयसिंगराव पवार इतिहासाचे संशोधन आणि लेखन जीवनकार्य म्हणून अखंड संशोधन करीत – प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव

डॉ.जयसिंगराव पवार इतिहासाचे संशोधन आणि लेखन जीवनकार्य म्हणून अखंड संशोधन करीत – प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव

1 second read
0
0
30

no images were found

डॉ.जयसिंगराव पवार इतिहासाचे संशोधन आणि लेखन जीवनकार्य म्हणून अखंड संशोधन करीत – प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव

कोल्हापूर, :- डॉ.जयसिंगराव पवार इतिहासाचे संशोधन आणि लेखन हे आपले जीवनकार्य म्हणून अखंड संशोधन करीत होते. डॉ.पवार प्रमाण इतिहास लिहिणारे इतिहासकार होते. त्यादृष्टीने त्यांनी संपूर्ण आयुष्यभर वाटचाल केलेली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक म्हणून त्यांनी अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडली. संशोधन केंद्रामध्ये त्यांनी भरीव योगदान दिलेले आहे. इतिहासामध्ये जे घडले आहे ते प्रामाणिकपणे पुराव्यानिशी लोकांपर्यंत मांडणारे मूर्तीमंत उदाहरण होते. त्यांच्या दु:खद निधनामुळे इतिहासाचे, शिवाजी विद्यापीठाचे न भरून येणारी हानी झालेली आहे.
डॉ.जयसिंगराव पवार यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये आज शोकसभेचे आयोजन करण्यात आले.
इतिहास अधिविभागप्रमुख डॉ.अवनिश पाटील म्हणाले, डॉ.पवार दस्तएैवजांना महत्व देणारे, वस्तुनिष्ठ इतिहासाची मांडणी करणारे मान्यता प्राप्त इतिहासकार होते. आवश्यक तेव्हा इतिहासासंदर्भातील घडामोडींबाबत निर्णायक मत व्यक्त करीत होते. डॉ.पवार यांनी व्यक्त केलेल्या मताला संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महत्वाचे स्थान होते. इतिहासाच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्या संशोधकांनी इतिहासाचा वारसा पुढे नेहणे ही मोठी जबाबदारी आहे. त्यांचे एक एक ग्रंथ हे स्वतंत्र प्रकल्प असल्याचे समोर आलेले आहे.
यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी शोकप्रस्तावाचे वाचन केले. वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागप्रमुख डॉ.श्रीकृष्ण महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.रघुनाथ ढमकले, डॉ.निलांबरी जगताप, डॉ.देविकाराणी पाटील, सचिन घोरपडे यांनी शोकभावना व्यक्त केल्या. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य अमरसिंग रजपूत, अधिविभागप्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, इतिहासप्रेमी जनता, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
——

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर पुणे,: महाराष्ट्र सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’वर विरोधकांकडून सातत्याने केली जाणारी टीका राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा दावा भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. शेतकरी हितार्थ सरकारने उचललेल्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले आहे. मंत्रिमंडळ टिपणाचा हवाला देत कर्जमाफी योजनेतील पात्रतेच्या अटींमुळे राज्यावरील आर्थिक भार कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या अटींचा उद्देश शेतकऱ्यांना वंचित ठेवणे नसून, प्रत्यक्ष गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हा आहे; असे प्रतिपादन पाटील यांनी केले. राज्य सरकारने अत्यंत जबाबदारीने ही योजना तयार केली आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा आणि कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेची परिणामकारकता वाढणार असून, निधीचा अपव्यय टाळण्यास मदत होईल, असे पाटील म्हणाले. विरोधकांनी योजनेतील अटींचा आधार घेत सरकारवर टीका करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक सूचना द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारने कर्जमाफीबरोबरच सिंचन, पीकविमा, कृषी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकरी कल्याण आणि कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत …