Home व्याख्यान दु.का. संत यांच्या जीवनकार्याविषयी २४ ला विद्यापीठात व्याख्यान

दु.का. संत यांच्या जीवनकार्याविषयी २४ ला विद्यापीठात व्याख्यान

0 second read
0
0
38

no images were found

दु.का. संत यांच्या जीवनकार्याविषयी २४ ला विद्यापीठात व्याख्यान

कोल्हापूर(प्रतिनिधी): मराठीतील ज्येष्ठ लेखक व संशोधक, तसेच ‘संशोधन पद्धती : प्रक्रिया-अंतरंग वांङ्मयीन विद्वत्ता’, ‘साहित्य आणि संस्कृती’ या ग्रंथांचे लेखक डॉ. दु.का. संत यांच्या नावे शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीने डॉ. दु.का. संत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेअंतर्गत मंगळवार, दि. २४ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता ‘डॉ.दु.का. संत जीवन आणि कार्य’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी अधिविभागाचे माजी प्रमुख डॉ.अविनाश सांगोलकर यांचे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाला उदयप्रकाश संत यांची प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे असतील. या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अधिविभाग प्रमुख डॉ.रणधीर शिंदे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In व्याख्यान
Comments are closed.

Check Also

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विज…