Home शासकीय शिव जयंती निमित्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

शिव जयंती निमित्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

6 second read
0
0
71

no images were found

शिव जयंती निमित्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

मुंबई,  : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

अभिवादन कार्यक्रमानंतर बृहन्मुंबई महानगर पालिकेतर्फे क्रीडा भवन येथे शिव जयंती कार्यक्रम संपन्न झाला. याठिकाणी राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत संगीत कला अकादमीच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे आणि शिवगीतांचे सादरीकरण करण्यात आले. 

राज्यपालांकडून कलाकारांना कौतुकाची थाप

संगीत कला अकादमीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या शिवगीतांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दाद देत कलाकारांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.मुंबईच्या महापौर रितू तावडे, खासदार अनिल देसाई, आमदार सुनील शिंदे, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर, आयुक्त भूषण गगराणी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –      सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –      सार्वजनिक आरो…