no images were found
“नववर्षात अजित पवार मुख्यमंत्री होणार?”, अमोल मिटकरींचा सूचक संदेश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून अजित पवारांनी भाजपाबरोबर संसार थाटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ४० हून अधिक आमदारांना आपल्याबरोबर घेऊन अजित पवार यांनी वेगळा गट बनवला आणि या गटासह ते महायुतीत सहभागी झाले आहेत. २ जुलै २०२३ रोजी त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हापासून अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. विरोधी पक्षांमधील नेते असो अथवा अजित पवारांचे समर्थक, अनेकांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असा दावा केला आहे. कधी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते, पदाधिकारी दावा करतात, तर कधी पक्षाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी तसे होर्डिंग्स लावतात, यासह कधी-कधी ठाकरे गट आणि काँग्रेस नेते दावा करतात की अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी तिकडे (महायुतीत) गेले आहेत. दरम्यान, अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी यावर भाष्य केलं आहे.
इोफ्रेंडलीअकोल्यातील एका कलाकाराने २०२४ चा संकल्प मांडणारी एक रांगोळी काढली आहे. या रांगोळीचा व्हिडीओ अमोल मिटकरी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. अजित पवार यांना २०२४ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवणे हा संकल्प या रांगोळीद्वारे जाहीर करण्यात आला आहे. या रांगोळीचा व्हिडीओ शेअर करत मिटकरी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही सर्वसामान्यांची भावना आम्ही यावर्षी प्रत्यक्षात उतरवू. या संकल्पासह ‘घड्याळ तेच वेळ नवी’ आणि ‘अजितपर्व’ असा हॅशटॅगही मिटकरी यांनी वापरला आहे.