Home सामाजिक आता ब्रह्मांडातील ते रहस्य उलगडणार !

आता ब्रह्मांडातील ते रहस्य उलगडणार !

14 second read
0
0
32

no images were found

आता ब्रह्मांडातील ते रहस्य उलगडणार !

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आणखी एक कमाल केलीय. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महत्त्वकांक्षी मिशन सुरु केलय. इस्रो अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा देश बनलाय. मागच्यावर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी पाऊल उमटवणारा भारत जगातील पहिला देश ठरला होता.
वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO ने इतिहास रचला आहे. इस्रोने XPoSAT सॅटलाइट लॉन्च केलय. श्रीहरिकोटा स्पेस सेंटरवरुन सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी XPoSAT सॅटलाइट लॉन्च करण्यात आलं. भारत अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा देश बनला आहे. XPoSAT ब्लॅक होलच रहस्य उलगडणार आहे. वेधशाळेला XPoSAT किंवा एक्स-रे पोलारिमीटर सॅटेलाइट म्हटलं जातं. एकावर्षापेक्षा कमी कालावधीत ब्रह्मांडाच्या शोधात भारताच हे तिसर मिशन आहे. मागच्यावर्षी भारताने चंद्रावर यशस्वी पाऊल ठेवलं. आता वर्ष 2024 च्या सुरुवातीला ब्रह्मांड आणि त्याच्याशी संबंधित रहस्य ब्लॅक होलबाबत माहिती मिळवण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. एक उन्नत खगोल विज्ञान वेधशाळा लॉन्च करणारा जगातील दुसरा देश बनला आहे. ब्लॅक होल आणि न्यूट्रॉनचा या मिशनमधून विशेष अभ्यास करण्यात येईल.
जेव्हा मोठ्या ताऱ्यांची ऊर्जा संपून जाते, तेव्हा ते गुरुत्वाकर्षणामुळे कोसळतात. ते आपल्यामागे ब्लॅक होल, न्यूट्रॉनचे तारे सोडून जातात. एक्स-रे फोटॉन आणि पोलरायजेशनचा वापर करुन XPoSAT ब्लॅक होल आणि न्यूट्रॉन ताऱ्यांच्या रेडिएशनचा अभ्यास करण्यासाठी मदत करेल. यात POLIX (एक्स-रे पोलारिमीटर इंस्ट्रूमेंट) आणि XSPECT (एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी आणि टायमिंग) नावाचे दोन पेलोड आहेत.
सॅटेलाइट POLIX पेलोडच्या माध्यमातून थॉमसन स्कॅटरिंगद्वारे 50 संभाव्य ब्रह्मांडीय सोर्समधून निघणारे एनर्जी बँड 8-30keV पोलरायजेशनच मापन करेल. ब्रह्मांडीय एक्स-रे सोर्सच दीर्घकाळ स्पेक्ट्रल आणि अस्थायी अभ्यास करेल. सोबतच POLIX आणि XSPECT पेलोडच्या माध्यमातून ब्रह्मांडीय सोर्स एक्स-रे उत्सर्जनाच पोलरायजेशन आणि स्पेक्ट्रोस्कोपिकचही मापन करेल.
ब्रह्मांडात ब्लॅक होलच गुरुत्वाकर्षण बल सर्वाधिक आहे. न्यूट्रॉन ताऱ्याच घनत्व सर्वाधिक आहे. या बाबत अधिक माहिती मिशनच्या माध्यमातून एकत्रित केली जाईल. त्याशिवाय अवकाशातील अंतिम टप्प्यातील वातावरणाची रहस्य जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न होईल. XPoSat सॅटलाइट बनवण्यासाठी 250 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. NASA ने अशा पद्धतीच मिशन IXPE वर्ष 2021मध्ये लॉन्च केलं होतं. त्यांना 188 मिलियन डॉलरचा खर्च आला होता.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…