no images were found
जयंत पाटलांच्या मनात नेमके काय?
पुणे : अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्रीराम मंदिराचं लोकार्पण होणार आहे, त्यानिमित्ताने देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कलश पूजनाचं आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील कलश पूजन करणार आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील श्रीराम मंदिरात जयंत पाटील यांच्याहस्ते कलश पूजन सोहळा होणार आहे. या कलश पूजन सोहळ्याला श्रीराम भक्तांनी उपस्थित राहावं, असं निमंत्रणही देण्यात आलं आहे.
मंत्रिपदाची चर्चा
दरम्यान आजच शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. जयंत पाटील इकडे येणार होते, म्हणूनच मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा खळबळजनक दावा संजय शिरसाट यांनी केला. जयंत पाटील हे शरिराने तिकडे आणि मनाने इकडे आहेत, असंही शिरसाट म्हणाले.
राम मंदिराच्या लोकार्पणाबाबत शरद पवारांना विचारण्यात आलं, त्यावेळी आपल्याला निमंत्रण आलं नसल्याचं शरद पवार म्हणाले. ‘राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाही, पुजे अर्चेत मी जात नाही. आमचे श्रद्धास्थान जे आहे ते सांगायची गरज नाही. सत्ताधारी पक्षासमोर सामान्य जनतेचे कोणताही कार्यक्रम नाही,म्हणून ते मंदिर मुद्दा पुढे करत आहे’, अशी टीकाही शरद पवारांनी केली. तसंच राम मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.