no images were found
भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापनदिनाच्या अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा
मुंबई :- भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था व मूल्यांचे जतन करण्याचे कर्तव्य पार पाडत असतानाच, देशाची प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचारधारा पुढे नेणे, सर्वधर्मसमभावाचा आदर करीत, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर अथक, निरंतर चालत राहण्याचा निर्धार करत, बलशाली भारत घडवूया, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी व जडणघडणीत योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्यासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या शहीद वीरांना मी अभिवादन करतो. कोट्यवधी स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवणे, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखणे. सशक्त, समर्थ, समृद्ध, बलशाली भारत आपल्याला घडवायचा आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या, देशाच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या योगदान, त्यागाबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध पुरस्कारांनी सन्मानीत झालेल्या मान्यवरांचे उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.