no images were found
बाबासाहेबांचा पदवी शिक्षणाचा सुवर्ण प्रवास
डॉ.बी.आर. आंबेडकर हे समानतेचे आणि समतापूर्ण समाजाच्या निर्मितीमध्ये शिक्षणाची भूमिका यांचे निस्सीम समर्थक होते. समाजातील पहिला पदवीधर होऊन त्यांनी इतिहास रचला. अनेक आव्हाने असताना देखील बाबासाहेबांनी सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी शिक्षणाचा प्रसार केला, इतरांनाही उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि पदवीधर होण्यासाठी प्रेरणा दिली. त्यांच्या वारशाने लोकांना शिक्षणाच्या अधिकारासाठी लढण्यास आणि समान समाजासाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले. पदवीधर बनण्याच्या त्यांच्या प्रवासामधून सामाजिक अडथळे आणि भेदभावांवर मात करण्याप्रती त्यांची अविरत कटिबद्धता आणि दृढनिश्चय दिसून येतो. आणि या कामगिरीमुळे ते समाजासाठी आशेचे किरण बनले. पदवीधर झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी बडोद्यातील महामहिम सयाजीराव गायकवाड यांच्याकडून शिष्यवृत्ती प्राप्त केली. एण्ड टीव्हीवरील मालिका ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्बेडकर’मधील आगामी एपिसोड २० जूनपासून बाबासाहेबांचा पदवी शिक्षणापर्यंतचा हा संस्मरणीय प्रवास दाखवणार आहे.
डॉ. आंबेडकर यांची आठवण काढत आणि पदवी शिक्षण पूर्ण करण्याच्या त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबात सांगताना मालिका ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्बेडकर’मध्ये भीमरावांची भूमिका साकारणारे अथर्व म्हणाले, ‘‘मालिकेमधील हा एपिसोड अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अशा प्रेरणादायी लीडरची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान मानतो. आम्हाला विश्वास आहे की प्रेक्षक हा एपिसोड पाहून प्रेरित होतील. बाबासाहेब हे अत्यंत कुशल शिक्षणतज्ञ होते. त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीसह अनेक पदव्या प्राप्त करून उत्तुंग यश संपादन केले. त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग उपेक्षित समुदायांच्या कार्यासाठी, सामाजिक न्याय आणि समानतेकरिता प्रयत्न करण्यासाठी केला. बाबासाहेब सर्वांसाठी शिक्षणाचे मुखर समर्थक म्हणून उदयास आले, विशेषत: सामाजिक भेदभावामुळे अन्यायकारकपणे शिक्षणाच्या संधी नाकारलेल्या समुदायांवर लक्ष केंद्रित केले. विद्यमान शैक्षणिक व्यवस्थेतील भेदभाव करणाऱ्या प्रथांचा सामना करताना त्यांनी शाळांपासून महाविद्यालयांपर्यंत शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. बाबासाहेबांची शिक्षणाप्रती अविरत कटिबद्धता आणि सामाजिक व आर्थिक उन्नतीमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेने भारतावर अमिट छाप सोडली आहे.’’