Home मनोरंजन अभिनेता बनण्यापूर्वी ‘मैत्री’ मालिकेतील समर्थ जुरेल हा राज्य पातळीवरील क्रिकेटपटू होता?

अभिनेता बनण्यापूर्वी ‘मैत्री’ मालिकेतील समर्थ जुरेल हा राज्य पातळीवरील क्रिकेटपटू होता?

0 second read
0
0
46

no images were found

अभिनेता बनण्यापूर्वी ‘मैत्री’ मालिकेतील समर्थ जुरेल हा राज्य पातळीवरील क्रिकेटपटू होता?

‘झी टीव्ही’वरील ‘मैत्री’ या मालिकेत मैत्री (श्रेणू पारिख) आणि नंदिनी (भाविका चौधरी) या दोन अगदी जीवश्चकंठश्च मैत्रिणींची कथा सादर करण्यात आली आहे. मैत्री आणि नंदिनी या दोघी बालपणापासूनच एकमेकींच्या घनिष्ठ मैत्रिणी असतात. आपली मैत्री कोणी कधीच तोडू शकणार नाही आणि आपण लग्नानंतरही एकमेकींच्या घनिष्ठ मैत्रिणी राहू, याची या दोघींना पक्की खात्री असते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच असते. आता मालिकेतील नातेसंबंधांमध्ये आमूलाग्र बदल घडून आला असून मैत्री आणि नंदिनी या एकमेकींपासून दुरावल्या आहेत. गेल्या काही भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की एकमेकांमध्ये कितीही मतभेद आणि वाद झाले तरी हर्ष (समर्थ जुरेल) आणि मैत्री हे एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि नंतर एकमेकांशी लग्नही करतात.

या सर्व नाट्यमय घटनांमध्ये मालिकेत अलीकडेच प्रवेस केलेला समर्थ जुरेलने आपल्या सहजसुंदर आणि दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली आहे. पण अभिनेता होण्यासाठी मुंबईला येण्यासाठी समर्थने आपली बहरत असलेली क्रिकेटमधील कारकीर्द सोडून दिली होती, ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे? इतकेच नव्हे, तर समर्थचे वडील हे क्रिकेटपटू होते, त्यामुळे आपल्या मुलानेही क्रिकेटपटू व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. पम म्हणतात ना, तुमच्या मनाला जे हवं असतं, तेच तुम्हाला मिळतं. त्यामुळेच क्रिकेटमध्ये कारकीर्द घडविण्यासाठी आपण मुंबईला जात आहोत, असे खोटेच सांगून समर्थने आपले मूळ गाव इंदूर सोडले आणि मुंबईत येऊन अभिनयाच्या क्षेत्रात उडी घेतली. आता गोष्टी त्याच्या मनासारख्या घडल्या असल्या, तरी सेटवरील फावल्या वेळेत तो आपल्या सहकलाकारांबरोबर क्रिकेट खेळतो.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…