Home सामाजिक महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे जानेवारीत काढलेल्या  लॉटरीच्या मासिक सोडतीचे निकाल जाहिर

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे जानेवारीत काढलेल्या  लॉटरीच्या मासिक सोडतीचे निकाल जाहिर

18 second read
0
0
13

no images were found

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे जानेवारीत काढलेल्या  लॉटरीच्या मासिक सोडतीचे निकाल जाहिर

 

मुंबई  :- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात ५ मासिक सोडती काढल्या जात असून जानेवारी-२०२४ महिन्यातील  मासिक सोडतीचे निकाल जाहिर करण्यात आले आहेत. १३ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र सह्याद्रीदि. १७ जानेवारी  रोजी महाराष्ट्र गौरवदि. २० जानेवारी  रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी न्यू इयरदि. २४ जानेवारी  रोजी महाराष्ट्र तेजस्व‍िनी व दि. २८  जानेवारी रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्या आहेत.

त्यापैकी महाराष्ट्र सह्याद्री या विक्री झालेल्या तिकीटांमधून एकूण २ हजार ८६९ तिकीटांना एकूण ७ लाख १८ हजार ८०० रुपये किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र गौरव मालिका तिकीट क्रमांक G-38/3627 या मे. प्रिन्स एजन्सीकाळबादेवीमुंबई कडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम ३५ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे. या सोडतीच्या एकूण ६ हजार २४१ तिकीटांना एकूण रू.४३ लाख ८ हजार रुपये किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र गणेशलक्ष्मी न्यू इयर विक्री झालेले एकूण १ हजार ७०५ तिकीटांना एकूण ८ लाख ८७ हजार रुपये किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र तेजस्विनी मालिका तिकीट क्रमांक TJ-02/3241 या महाराजा लॉटरी सेंटरइचलकरंजीकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम  २५ लाख रुपये किंमतीचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे. या सोडतीच्या एकूण ९१२ तिकीटांना एकूण ३१ लाख ७१ हजार ८०० रुपये किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र गजराज विक्री झालेल्या तिकीटांमधून एकूण २ हजार ६६० तिकीटांना एकूण २ लाख ९८ हजार ३५० रुपये किमतीचे बक्षीस जाहीर झाले आहे.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून १० हजार  रुपये वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी या कार्यालयाकडे सादर करावी.  रूपये १०हजाराच्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करावीअसे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…