no images were found
जरगनगर शाळेमध्ये लोकसहभागातून 36 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते लोकार्पण
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर शाळेत जी एम एफ परफॉर्मन्स मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड, रोटरी क्लब ऑफ मुंबई दिवास यांच्या सौजन्याने व इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट यांच्या माध्यमातून लोकसहभाग फंडातून तब्बल 36 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा आज लोकार्पण करण्यात आला. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या शुभहस्ते व रोटरी क्लब ऑफ मुंबई दिवासच्या अल्फा प्रेसिडेंट सौ. सौम्या अग्रवाल व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आला.
यामध्ये रोटरी क्लब कडून शाळेमध्ये चार नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, शाळेचे क्रीडांगण सपाटीकरण, चार नवीन वर्गात बेंच, शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, लहान मुलांसाठी किड्स प्ले गाऊंड, इमारत रंगकाम, सर्व वर्गात LED टीव्ही, सिरॅमिक बोर्ड, लोखंडी कपाट इत्यादी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता ठोंबरे यांनी रोटरी क्लब ऑफ मुंबई दिवास यांच्या सहकार्याने ही शाळा सोनेरी परिवर्तन अनुभवत आहे, त्याबद्दल रोटरीचे त्यांनी आभार मानले.
शाळेला केलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल महापालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते रोटेरीयन डॉ. सौम्या अग्रवाल, रोटेरियन सौ. उमा जाजोदिया, इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे झोनल मॅनेजर सजी राजन, सी एस आर फंड व्यवस्थापक संग्राम पाटील, सहा. व्यवस्थापक सुशांत चंदनशिवे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी रोटरी क्लबने केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच जरगनगर शाळेतील कामकाजाचे कौतुक केले.
शाळेमधील भौतिक सुविधा सुरू असताना शाळेच्या वतीने समन्वयाबद्दल रोटरी क्लब कडून सुनील पाटील व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये शाळेने जिल्ह्यामध्ये मिळवलेल्या तृतीय क्रमांकाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नीता ठोंबरे यांचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मोरमारे व सौ.स्वाती ढोबळे यांनी केले तर आभार सौ स्मिता कारेकर यांनी मानले.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, उपायुक्त साधना पाटील, महिला व बालकल्याण समितीचे अध्यक्ष सौ. प्रिती घाटोळे, इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे अमोल नाळे, अरुण शिंदे, सूची मेनन, भारत जगताप, संजय लुमान, माधुरी मुसळे, माजी नगरसेवक मधुकर रामाने, सामाजिक कार्यकर्ते संतोष जरग, प्रशासनाधिकारी शंकर यादव, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, सौ.उषा सरदेसाई, शांताराम सुतार, सौ.विमल गवळी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष संध्या देवडकर, उपाध्यक्ष बाळासाहेब काळे, सर्व सदस्य, शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.