no images were found
“तारा-हितगुज तरुणाईचे” या अभियानांतर्गत गुड टच बॅड टचची माहिती पत्रके शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप
कोल्हापूर :- महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी हितगुज तरुणाईचे अंतर्गत गुड टच बॅड टच (चांगला स्पर्श वाईट स्पर्श ) याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यामोहिमेअंतर्गत आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती पत्रके वाटप करण्यात आली. महापालिकेच्या लक्ष्मीबाई कृ. जरग विद्या मंदीर शाळेमधील 1 ते 7 वीच्या 2148 विद्यार्थ्यांना ही माहिती पत्रके वाटप करण्यात आली.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी यावेळी बोलताना महापालिकेच्यावतीने किशोर वयीन मुंलीसाठी तारा हितगुज तरुणाईचे अंतर्गत किशोरी मेळाव्यामध्ये हिमेाग्लोबीन तपासणी केली आहे. मुलींना आपल्या आरोग्याविषयी आत्मविश्वास कसा निर्माण करता येईल यासाठी हा उपक्रम महिला व बालकल्याण समितीमार्फत राबविण्यात येत आहे. गुड टच बॅड टचबाबत आपण समाजामध्ये बरेच ऐकलेले आहे. बऱ्याचवेळा शाळेतील मुलांना याबद्दल काही कळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी ही माहिती पत्रके वाटप करण्यात येत आहेत. याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. आत्तापर्यंत महापालिकेच्या 58 शाळेमध्ये 10,697 विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच (चांगला स्पर्श वाईट स्पर्श) याबाबतची माहिती पत्रके वाटप करण्यात आली आहेत. यासाठी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत 4 लाख 81 हजार 365 इतका खर्च करण्यात आला आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, उप-आयुक्त साधना पाटील, प्रशासन अधिकारी शंकर यादव, रोटरी क्लब ऑफ मुंबई दिवासच्या अल्फा प्रेसिडेंट सौ. सौम्या अग्रवाल, झोनल मॅनेजर, सजी राजन, फॉरमर प्रसिडेंट सौ.उमा जाजोदिया, मॅनेजर संग्राम पाटील, सुशांत चंदनशिवे, सौ.माधुरी मुसळे, महिला व बालकल्याण विभागाच्या अधिक्षक सौ.प्रिती घाटोळे, सीएम फेलो आचल बागडे, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, शिक्षक, शिक्षीका व विद्यार्थी पालक मोठया संख्येने उपस्थित होते.