no images were found
‘आंगन सपनो का’मालिकेत जयदेवच्या जोखमीच्या कर्जाने कुटुंबाचे घर सापडले संकटात
सोनी सबवरील ‘आंगन अपनो का’ मालिकेत समर्पित एकेरी पिता जयदेव शर्मा (महेश ठाकूर) यांची आपल्या तीन मुलींसोबतच्या घट्ट नात्याची हृदयस्पर्शी कथा चितारण्यात आली आहे. पल्लवी (आयुषी खुराना) आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात करते. मात्र वडिलांप्रतीची आपली कर्तव्ये आणि नव्या कुटुंबाची जबाबदारी यांच्यातील नाजूक समतोल साधताना पल्लवीचा खूप मोठा संघर्ष करावा लागतो. त्यातच तिला सासूबाई अपर्णा (कशीश दुग्गल) यांच्याकडून आव्हानांचा सामना करावा लागतो. मालिकेच्या अलीकडील भागांत प्रेक्षकांनी पाहिले की, जयदेव हे एक जोखमीचा निर्णय घेतात. ते आपले घर गहाण ठेवतात आणि गुपचूपरीत्या कर्जाची रक्कम आपला जावई वरुणला (वसीम मुश्ताक) त्याच्या स्टार्टअप उद्योगासाठी मदत म्हणून उधार देऊन टाकतात.
मालिकेच्या आगामी भागांत दिसणार आहे की, कर्ज घेतल्याचे वास्तव आपल्या लेकींपासून लपवण्याचे जयदेव यांचे प्रयत्न फोल ठरून सत्य उजेडात येतेच. तन्वी (अदिती राठोर) घराची कागदपत्रे शोधून काढते अन् संभाव्य गहाणखताबाबत तिचा जयदेव यांच्याशी सामना होतो. दुसरीकडे दीपिका (नीता शेट्टी) वरुणच्या स्टार्टअप गुंतवणुकीच्या स्रोतांबाबत त्यांना विचारू लागते. सरतेशेवटी त्या सत्य परिस्थितीचा छडा लावतातच. आपल्या वडिलांनी गुपचूपरीत्या वरुणला पैसे दिल्याचे कळाल्यानंतर त्या अत्यंत दु:खी होतात. आपल्या वडिलांच्या आर्थिक परिस्थितीबाबत या लेकींची चिंता वाढू लागते, शर्मा हाऊसच्या भवितव्यावर धोक्याचे मळभ दाटू लागते. अगणित आठवणींनी भरलेल्या आपल्या लहानपणाचे घर सुरक्षित करण्यासाठी शर्मा परिवाराचा संघर्ष पाहून प्रेक्षक आपल्या जागेवरून उभे राहतील हे नक्कीच. ते घर अखेर त्यांचे राहते की नाही, याची उत्सुकताही असेल.
मालिकेत पल्लवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आयुषी खुराना म्हणाली की, “आपल्या अनुपस्थित वडिलांची काळजी घेण्याबाबत पल्लवीला नेहमीच चिंता लागलेली असते. आता तर त्यांची आर्थिक स्थैर्यता आणि त्यांचे घरही पणाला लागलेले आहे. एका पित्याच्या रूपात ज्यांनी आपल्या लेकींसाठी इतका मोठ्या त्याग केला आहे, गरजेच्या वेळी त्यांची मदत करण्यात असमर्थ असल्याच्या विचाराने त्यांना एक असहाय्यतेची भावना जाणवू लागते. मालिकेच्या आगामी कथानकात तीव्र भावनिक क्षण अनुभवण्यास मिळतील, जेव्हा जयदेव, पल्लवी आणि तिच्या बहिणी एकत्रितपणे या आव्हानातून कशा प्रकारे मार्ग काढतात हे प्रेक्षकांना अनुभवायला येईल.”