no images were found
‘पश्मिना – धागे मोहब्बत के’ मालिकेत पारसच्या कुटील कारस्थानांमुळे ऋषी आणि पश्मिनाचे लग्न मोडणार का?
सोनी सबवरील ‘पश्मिना – धागे मोहब्बत के’ मालिका काश्मीरच्या पार्श्वभूमीवर रंगणारी एक निर्मळ प्रेमकथा आहे. यात झळकत असलेले राघव (निशांत मलकानी) आणि पश्मिना (ईशा शर्मा) या प्रेमी युगुलाची कथा दाखवण्यात आली आहे. मात्र त्यांच्या आयुष्यातील अनेक आव्हानांमुळे त्यांचे आयुष्य एकाच वाटेवर येऊन थांबत नाही. मालिकेतील अलीकडच्या भागांत आपण पाहिले की, पश्मिना आपल्या कुटुंबाच्या आनंदाला प्राधान्य देत ऋषीसोबत (लीनेश मट्टू) विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेते. तर दुसरीकडे, राघवला जीवे मारण्याची धमकी देत पारस (अंगद हसिजा) हा विवाहापासून पश्मिनाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतो.
मालिकेच्या आगामी भागांत आपण पाहणार आहोत की, पश्मिना ऋषीसोबत विवाहबद्ध होण्यासाठी सज्ज झालेली असताना ऋषी पुन्हा एकदा आपली दुष्ट प्रवृत्ती दाखवत पश्मिना आणि राघव यांच्यातील खासगी क्षणांची छायाचित्रे सर्वांसमोर लीक करून टाकतो. सर्वांसाठी आश्चर्याचा मोठा धक्का म्हणजे, ही छायाचित्रे पश्मिना आणि ऋषीच्या साखरपुड्यानंतर टिपलेली असतात. यामुळे एकच हलकल्लोळ उठतो आणि परिणामी ऋषीचा हृदयभंग होतो. पश्मिना आणि राघव या स्थितीचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत असताना ऋषी काय प्रतिक्रिया देईल? पारसची ही कृत्ये ऋषी आणि पश्मिना यांचे मिलन मोडून काढतील का, असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनांत उपस्थित होतो.
मालिकेत पश्मिनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा शर्मा म्हणाली की, “पश्मिनाच्या आयुष्यात पारस हा निरंतर अडथळे आणणारा स्रोत ठरला आहे, त्याने नेहमीच तिला संकटांत टाकलेले आहे. मालिकेच्या आगामी कथानकानुसार, पश्मिना आणि राघव हे विभक्त होण्याचा निर्णय घेतात. आपापल्या कुटुंबांच्या आनंदाखातर पश्मिना ही अखेर ऋषीसोबत विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेऊन लग्नाच्या तयारीला लागते. तथापि, पारस कुटीलपणे पश्मिना आणि राघव यांची छायाचित्रे लीक करून टाकल्यानंतर एकच गजहब उडून अडचणी उद्भवतात. जेव्हा या पश्मिना ही परिस्थितीचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करते तेव्हा भावभावनांची मोठी लाटच उसळते. यानंतर तिचे लग्न निर्विघ्नपणे पार पडते की ऋषी हे संबंधच तोडून टाकतो? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.”
मालिकेत ऋषीची भूमिका निभावणारा अभिनेता लीनेश मट्टू म्हणाला की, “हा ऋषीसाठी नक्कीच हृदयाचे तुकडे करून टाकणारा क्षण ठरणार आहे. पश्मिनाच्या भूतकाळाला तो मनाच्या अंत:करणापासून पाठिंबा देत आलेला आहे, एकदाही त्याने तिच्यावर संशय घेतलेला नाही. जीवलग मित्र असल्यामुळे राघववर ऋषी नेहमीच प्रचंड विश्वास ठेवत आलेला आहे. मात्र ही लीक झालेली छायाचित्रे पाहता आपल्या डोळ्यासमोर जो घटनाक्रम घडला आहे, त्याकडे दुर्लक्ष करणे त्याच्यासाठी प्रचंड आव्हानात्मक ठरणार आहे. यावर ऋषी काय प्रतिक्रिया देईल आणि त्याचा अंतिम निर्णय काय असेल, हे पाहणे प्रेक्षकांसाठी रहस्यमय क्षण ठरणार आहे.”