Home Uncategorized आयटीआय मधून प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात उद्यमनगरीचा पाया रचणार्‍या म्हादबा मिस्त्री यांचा आदर्श ठेवावा, खासदार धनंजय महाडिक यांचं आवाहन

आयटीआय मधून प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात उद्यमनगरीचा पाया रचणार्‍या म्हादबा मिस्त्री यांचा आदर्श ठेवावा, खासदार धनंजय महाडिक यांचं आवाहन

5 second read
0
0
18

no images were found

 आयटीआय मधून प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात उद्यमनगरीचा पाया रचणार्‍या म्हादबा मिस्त्री यांचा आदर्श ठेवावा, खासदार धनंजय महाडिक यांचं आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी):-उद्यम नगरी अशी कोल्हापूरची ओळख आहे. म्हादबा मिस्त्री यांनी या उद्यमनगरीचा पाया रचला. त्यांच्यामुळे श्रमांना प्रतिष्ठा आणि गती मिळाली. आयटीआयमधील विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श कायम ठेवावा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. आयटीआयमधून प्रशिक्षित झालेल्या ३० अभ्यासक्रमातील प्रत्येकी पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात खासदार महाडिक बोलत होते.
केंद्र शासनाच्या शिल्प प्रशिक्षण योजना, म्हणजेच शिल्पकार प्रशिक्षण योजनेतून कोल्हापुरातील राजर्षि छत्रपती शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शनिवारी सायंकाळी दिक्षांत कार्यक्रम झाला. विविध ३० प्रकारचे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रमाणपत्रं देण्यात आले. यश पाटील, श्रृती कांबळे, सार्थक शिंदे, शिवराज वडार, प्रमोद कुंभोजकर, धनंजय उलपे, श्रावणी भोसले यांच्यासह विविध ट्रेडमधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून खासदार महाडिक यांनी शुभेच्छा दिल्या. प्रारंभी प्राचार्य महेश आवटे यांनी आयटीआयच्या कामगिरीचा आढावा घेतला. आयटीआयमध्ये शिकवल्या जाणार्‍या सर्व कोर्सेसना विद्यार्थ्यांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्किल इंडिया, स्टार्टअप योजनांचा हा सकारात्मक परिणाम असल्याचं, आवटे यांनी नमुद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे देशात डिजिटल क्रांती झाली. नोकरी मागणारे हात होण्याऐवजी आता नोकरी देणारे हात व्हावेत, हा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. त्यासाठी किमान कौशल्यावर आधारीत विविध कोर्सेस सुरू झाले आहेत. उद्यमनगरी कोल्हापूरचा पाया म्हादबा मिस्त्री यांनी रचला. त्यांच्यामुळे श्रमांना प्रतिष्ठा आणि गती मिळाल्याने, आयटीआयमधील विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श कायम ठेवावा, असेही खासदार महाडिक म्हणाले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लखनऊ इथं आयटीआय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. त्याचे थेट प्रक्षेपण कोल्हापुरातील विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. देशभरातील १२१ आयटीआय आणि २३ राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये हे प्रक्षेपण दाखवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी उपप्राचार्य विजयकुमार नार्वेकर, ज्योती कचरे, ए सी कांबळे, अपुर्वा सुतार, ऐश्‍वर्या माळकर, श्रीनिवास निळकंठ, भास्कर घोरपडे, सुजित कोकाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

रिक्शा चालकांच्या विविध मागण्यांसाठी रिक्शा चालकांचे जिल्हा बंद आंदोलन !

रिक्शा चालकांच्या विविध मागण्यांसाठी रिक्शा चालकांचे जिल्हा बंद आंदोलन ! कोल्हापूर –…