Home Uncategorized “जत्रा आंब्यांची” महोत्सवाचे शाहू मिल येथे आयोजन

“जत्रा आंब्यांची” महोत्सवाचे शाहू मिल येथे आयोजन

1 second read
0
0
42

no images were found

“जत्रा आंब्यांची” महोत्सवाचे शाहू मिल येथे आयोजन

 कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व २०२३ स्मृती शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ६ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता शाहू मिल कोल्हापूर येथे “जत्रा आंब्यांची” 2023 महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकसुनील फुलारी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर उपस्थित राहणार आहेत.

करवीरवासीयांना नैसर्गिकरित्या पिकवलेला अस्सल कोकणातील हापूस आंबा व केशर आंबा उपलब्ध व्हावा, तसेच आंबा उत्पादकांना सुद्धा योग्य दर मिळावा, यासाठी मागील ३ वर्षापासून कृषी पणन मंडळाच्या वतीने कोल्हापूर शहरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. हा महोत्सव दि. ६ ते १४ मे  या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहणार असून सर्व कोल्हापूरकरांनी जत्रा आंब्याची २०२३ या महोत्सवास मोठ्या प्रमाणात भेट देऊन आंब्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

तळातील समाजघटकांना परवडणारे तंत्रज्ञान अभियंत्यांनी विकसित करावे.- डाॅ. प्रतापसिंह देसाई.

  तळातील समाजघटकांना परवडणारे तंत्रज्ञान अभियंत्यांनी विकसित करावे.- डाॅ. प्रतापसिंह …