
no images were found
शिवाजी विद्यापीठात हिंदीचे राष्ट्रीय चर्चासत्र
कोल्हापूर (प्रतिनिधी): हिंदी साहित्यातील सुप्रसिद्ध व्यंगकार हरिशंकर परसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठात हिंदी विभागाच्या वतीने आज 5 मार्च, 2024 रोजी एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये हरिशंकर परसाई यांच्या साहित्यातील व्यंगाचे विविध पैलू या विषयावर प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थ्यानी उपस्थित राहण्याचे आवाहन प्र. विभाग प्रमुख डॉ. ए. एम. सरवदे यांनी केले आहे.
विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषा भवन येथे आयोजित चर्चासत्राचे उदघाटन डॉ. सुरेश माहेश्वरी (अमळनेर) यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. डी. टी.
शिर्के, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील उपस्थित राहणार आहेत. चर्चासत्रामध्ये विषयतज्ज्ञ म्हणून डॉ. वृषाली मांद्रेकर (गोवा), डॉ. अरुण गंभीरे (उस्मानाबाद), डॉ. सुनील बनसोड़े (जयसिंगपूर), डॉ. साताप्पा सावंत (सांगली) मार्गदर्शन करणार आहेत. समापन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे व अध्यक्षस्थानी डॉ. अर्जुन चव्हाण उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. सरवदे यांनी दिली.