Home मनोरंजन ऐश्वर्या शर्मा, मुस्कान बामणे आणि इतर अनेक लोकप्रिय कलाकारांनी लो चुडैल चली ससुरालमधील हिबा नवाब आणि अधिक मेहताच्या ‘मेरी वाली चुडैल है’ या म्युझिक व्हिडिओवर दिल्या खास प्रतिक्रिया

ऐश्वर्या शर्मा, मुस्कान बामणे आणि इतर अनेक लोकप्रिय कलाकारांनी लो चुडैल चली ससुरालमधील हिबा नवाब आणि अधिक मेहताच्या ‘मेरी वाली चुडैल है’ या म्युझिक व्हिडिओवर दिल्या खास प्रतिक्रिया

6 second read
0
0
10

no images were found

ऐश्वर्या शर्मा, मुस्कान बामणे आणि इतर अनेक लोकप्रिय कलाकारांनी लो चुडैल चली ससुरालमधील हिबा नवाब आणि अधिक मेहताच्या ‘मेरी वाली चुडैल है’ या म्युझिक व्हिडिओवर दिल्या खास प्रतिक्रिया

      सोनी सबची आगामी विनोदी मालिका लो चुडैल चली ससुराल जादू, विनोद आणि कौटुंबिक नाट्याचा मनोरंजक संगम प्रेक्षकांना अनुभवायला देणार आहे. या मालिकेत हिबा नवाब साकारत असलेल्या उर्वशी या उत्साही तरुण चुडैलच्या मजेशीर गोंधळांनी भरलेल्या प्रवासाची कथा उलगडणार आहे, जी एका मानवी कुटुंबात आयुष्य जगताना अनेक भन्नाट अनुभवांना सामोरी जाते. मालिकेच्या आगमनापूर्वीच तिचं ‘मेरी वाली चुडैल है’ हे गाणं, ज्यामध्ये हिबा नवाब आणि अधिक मेहता झळकले आहेत, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं असून सोशल मीडियावर त्याला भरभरून प्रेम आणि कौतुक मिळत आहे.

       या म्युझिक व्हिडिओला मनापासून प्रतिसाद मिळाला आहे. इंडस्ट्रीतील मित्रमंडळी आणि चाहत्यांनी एकत्र येत या गाण्याचा आनंद साजरा केला. लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा यांना हा व्हिडिओ खूप आवडला आणि त्यांनी तो त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत हिबाला प्रेमाने “ब्युटीफुल चुडैल” असे म्हटले. मुस्कान बामणे हिनेही “<3” कमेंटद्वारे अधिकसाठी आपले प्रेम आणि पाठिंबा व्यक्त केला. त्यांच्यासोबत आशीष केदार, राघव गोसाईन, आकांक्षा शर्मा, भाव्या सचदेवा आणि शांतनू मोगना यांसह अनेक लोकप्रिय कलाकारांनीही या व्हिडिओचे कौतुक केले. सोशल मीडियावर मिळालेल्या या भरभरून प्रेमामुळे उत्साहात आणखी भर पडली असून, हिबा आणि अधिकसाठी या गाण्याचे प्रकाशन अधिक संस्मरणीय बनले आहे.

    म्युझिक व्हिडिओला मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल बोलताना हिबा नवाब म्हणाल्या, “‘मेरी वाली चुडैल है’ हे गाणं सगळ्यांना इतकं आवडताना पाहून खूप छान वाटतंय. खरं सांगायचं तर, माझे मित्र या गाण्याच्या अक्षरशः प्रेमात पडले आहेत आणि सतत माझ्यासमोर ते गात असतात. त्यांनी त्यांच्या स्टोरीजवरही हा म्युझिक व्हिडिओ शेअर केला आहे, जे खूप गोड आहे. लोक माझ्या आवाजावर जे प्रेम करत आहेत, विशेषतः हा माझा पहिलाच रॅपिंगचा अनुभव असल्यामुळे, ते पाहून मी भारावून गेले आहे. मला अशा प्रकारच्या प्रतिसादाची अजिबात अपेक्षा नव्हती आणि त्यामुळे हा संपूर्ण अनुभव आणखी खास बनला आहे. हे गाणं बनवताना आम्ही खूप धमाल केली आणि ते ऐकताना प्रेक्षकांनाही तितकाच आनंद मिळतो आहे, याचा मला खूप आनंद आहे.”

म्युझिक व्हिडिओला मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल बोलताना अधिक मेहता म्हणाले, “म्युझिक व्हिडिओला मिळालेल्या प्रतिसादामुळे मी खूप आनंदी आहे. या गाण्याची चाल इतकी आकर्षक आहे की माझ्यासह माझ्या आजूबाजूच्या लोकांच्याही डोक्यातून ती काही केल्या जात नाही. हे गाणं शूट करताना मी खूप मजा केली आणि त्याच्या हुक स्टेपची प्रॅक्टिस करणंही तितकंच मजेशीर होतं. तुमचं काम तुमचे मित्र शेअर करताना आणि तुम्हाला प्रोत्साहन देताना पाहणं नेहमीच छान वाटतं, पण चाहत्यांकडून मिळालेलं प्रेम खरोखरच खास आहे. आम्हाला हे गाणं तयार करताना जितका आनंद मिळाला, तितकाच आनंद लोकांनाही ते पाहताना आणि ऐकताना मिळतो आहे, याचा मला खूप आनंद आहे. त्यामुळे हे गाणं तयार करण्यासाठी आम्ही घेतलेली मेहनत आणि केलेली मजा आणखी सार्थक वाटते.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

कार्तिकी शुद्ध एकादशी निमित्त निघालेल्या पालखी सोहळ्यात खासदार धनंजय महाडिक यांचा सहभाग, वारकऱ्यांसमवेत भक्तीरसात तल्लीन

कार्तिकी शुद्ध एकादशी निमित्त निघालेल्या पालखी सोहळ्यात खासदार धनंजय महाडिक यांचा सहभाग, व…