no images were found
बिग डिप्पर इन्शुरन्स ब्रोकर्स कंपनीचे मालोजीराजे यांच्या हस्ते उदघाटन
कोल्हापूर, – बिग डिप्पर इन्शुरन्स ब्रोकर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर या कंपनीचे उदघाटन येत्या गुरुवारी (ता. ३०) श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष रणजितसिंह पुं. पाटील यांनी दिली.
या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, ज्याप्रमाणे सप्तर्षी होकायंत्राचे काम करते आणि उत्तर दिशा दर्शविते त्याप्रमाणे आमची बिग डिप्पर कंपनी विमा क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करेल. बिग डिप्पर म्हणजेच सप्तर्षी. या गेल्या २० वर्षांपासून आहे. यामध्ये फेलोशिप मिळालेली आहे. त्या दृष्टीने रि-इन्शुरन्स व्यवस्थापक म्हणून मी काम पाहतो. इतक्या मोठ्या अनुभवानंतर येथे कंपनीची स्थापना केली आहे.ते म्हणाले, रेल्वे स्टेशनसमोरील रॉयल मिराज आर्केड येथे पहिल्या मजल्यावर कंपनीचे कार्यालय आहे. समाजाच्या प्रती आपले उत्तरदायित्व जपण्यासाठी येथे कंपनीचे कार्यालय सुरू केले असून कंपनीच्या वतीने वैयक्तिक, औद्योगिक क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्राला सेवा देण्यात येईल. यात साधारण विमामध्ये आग, चोरी, इंजिनिअरिंग, वाहन, आरोग्य, न्यायालयातील दावे (लायबिलिटी), तेल विहिरी, विमान, जहाज आणि जहाजावरील मालवाहतूक अशा संबंधित घटकांना कंपनी सेवा देईल. श्री. पाटील म्हणाले, इन्शुरन्स क्षेत्रामध्ये उच्च पदावर काम करणाऱ्या मराठी युवकांची देशाबरोबर देशाबाहेरही कमी आहे. त्यांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने, नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कारगिल योद्धा कॅप्टन योगेंद्रसिंह यादव यांचे यावेळी मार्गदर्शन होणार आहे. त्याशिवाय युवकांना कंपनीच्या वतीने रिस्क मॅनेजमेंट, क्लेम मॅनेजमेंट आणि अंडर रायटिंग याविषयी स्वतः मी मार्गदर्शन करणार आहे. यासाठी सैनिक, अग्निवीरबरोबर युवा पिढीने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री. पाटील यांनी यावेळी केले.
दरम्यान, शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी सकाळी दहा वाजता उदघाटन होणाऱ्या या कार्यक्रमाला उद्योजक व्ही. बी. पाटील, युनायडेट इंडिया इन्शुरन्सचे माजी व्यवस्थापक विजय पवार, डायरेक्टर अँड प्रिन्सिपल ऑफिसर अमित जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील.