no images were found
मात्लिकेत उलगडणार गणपतीच्या आवडत्या मोदका मागील गोड कथा
सोनी सबची “गाथा शिव परिवार की” ही मालिका दैवी कथाकथनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे. ही मालिका भगवान शिव (मोहित मलिक), देवी पार्वती (श्रेणू पारीख), आणि त्यांचे पुत्र भगवान गणेश (एकांश कथरोटिया) व भगवान कार्तिकेय (सुभान खान) यांच्या असाधारण प्रवासाचा मागोवा आहे.
यातील हृदयस्पर्शी पौराणिक प्रसंग भगवान गणेशाच्या मोदकावरील प्रेमामागील गोड रहस्य उलगडतो. ही कथा पार्वती तिच्या एकदंत असलेल्या मुलाला संयमाचा धडा शिकवते. गोड अतिशय प्रिय असलेल्या गणेशाच्या लाडूत एकदा पार्वती जाणूनबुजून साखर टाकत नाही. यामुळे गणेश संतुलित राहतील, अशी पार्वतीला आशा वाटते. पार्वतीच्या या कृतीने गणेश निराश होतात व जेवणच सोडून देतात. गणेशाचे भाऊ भगवान कार्तिकेय यांना हे कळते तेव्हा ते याबाबत भगवान शिवाचा सल्ला घेतात. भगवान शिव त्यांना अत्री ऋषींची दयाळू पत्नी अनसूया यांच्याकडे जाण्याचा सल्ला देतात. अनसूया एका भव्य मेजवानीचे आयोजन करतात व मोदक हा एक नवीन गोड पदार्थ बनवतात. स्वादिष्ट आणि पौष्टिक मोदक हा विचारशीलता आणि संतुलनाचे प्रतीक आहे. भगवान गणेश या परिपूर्ण निर्मिती म्हणजे त्या मोदकाचा आस्वाद घेतात त्या क्षणी त्यांचे दुःख नाहीसे होते. मोदक लगेचच त्यांचे हृदय जिंकतो आणि सर्वात प्रिय बनतो. मोदक म्हणजे प्रेम आणि सजग काळजीचे एक कालातीत प्रतीक आहे.
भगवान गणेशाची भूमिका करणारा एकांश कथरोटिया म्हणाला, “मला ही कहाणी शूट करायला खूप मजा आली. ही कहाणी गणेशाच्या कुटुंबात किती प्रेम आहे हे दर्शवते. पार्वती माता त्याला धडा शिकववण्यासाठी नव्हे, तर त्याची काळजी घेण्यासाठी मिठाई बनवणे थांबवते. जेव्हा अनसूया माता मोदक बनवते तेव्हा ते फक्त गणेशासाठी खूप प्रेमाने बनवलेले काही तरी विशेष बनते. म्हणूनच मोदक त्याचा आवडता बनतो, तो फक्त चविष्टच नाही, तर प्रेम आणि काळजीने परिपूर्ण असतो.”