Home मनोरंजन महाराष्ट्रभर आनंदाचा गंध पसरवायला येत आहे “कस्तुरी”

महाराष्ट्रभर आनंदाचा गंध पसरवायला येत आहे “कस्तुरी”

6 second read
0
0
32

no images were found

महाराष्ट्रभर आनंदाचा गंध पसरवायला येत आहे “कस्तुरी”

 

जून : असं म्हणतात आईनंतर निःस्वार्थी प्रेम करणारे कोणी असेल तर ती फक्त बहीणच असते. हे अनोखं नातं म्हणजे बहिण – भावाचं. कस्तुरी आणि नीलेशचं नातं देखील असंच आहे अगदी घट्ट. पण, बहिणीची वेडी माया कधी भावाला कळली आहे का? तिच्या पोटी लपलेली भावा विषयीची काळजी त्याला कधी कळेल ? आपल्या भावासाठी प्रत्येक सुखाचा त्याग करणारी, आलेल्या अडचणींना ठामपणे सामोरी जाणारी, प्रत्येक कठीण प्रसंगात त्याच्यासोबत असणारी कस्तुरी अचानक आपल्या भावाशी अबोला का धरते ? त्यांच्या नात्यात दुरावा का येतो ? असं काय घडतं या दोघांचे आयुष्य संपूर्णपणे बदलून जाते ? नात्यांना जोडणारी, घट्ट धरून ठेवणारी कस्तुरी असा टोकाचा निर्णय का घेते ? जाणून घेण्यासाठी बघा हॅपी डिजिटल निर्मित “कस्तुरी” २६ जून  पासून सोम ते शनि रात्री १०.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. एकता लब्दे कस्तुरीची भूमिका साकारणार असून समर कुबेरची भूमिका अशोक फळदेसाई तर निलेशची भूमिका दुष्यंत वाघ साकारणार आहे.

 अत्यंत दिलदार स्वभावाची, दुसऱ्यांना मदत करायला सदैव तत्पर असणारी कस्तुरी. जिचा ‘करुणा’ हा स्थाई भाव आहे. कस्तुरी मातीत रुजलेली असली तरी तिला नाविन्याची आवड आहे. कस्तुरी तुकोबांच्या विचाराने वागते, “खटाशी असावे खटनट, उद्धटाशी उद्धट”. निलेश कस्तुरीचा धाकटा भाऊ. अत्यंत हुशार पण संतापी आहे. निलेश समर कुबेर याच्या पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. समर अत्यंत महत्वाकांक्षी. काहीसा स्वार्थी, पण काहीतरी चांगलं करून धाकवण्याची ईच्छा असलेला कुबेर घराण्याचा मुलगा आहे. पण निलेशला कस्तुरीचा विरोध आहे. बहिण भावाच्या नात्यात प्रेम आहे, मान आहे, बहिण करत असलेल्या मेहनतीची जाणीव आहे. पण, तिचा विरोध असल्याने त्यांच्यात खटके उडत आहेत. समरच्या आयुष्यात येण्याने अशी कुठली घटना घडणार ज्यामुळे तिघांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळणार ? समरच्या मनात दडलेलं असं कुठलं सत्य आहे ज्यापसून कस्तुरी अनभिज्ञ आहे. हे आपल्याला हळूहळू कळेलच.

 मालिकेविषयी बोलताना व्यवसाय प्रमुख, कलर्स मराठी, (वायकॉम18) – अनिकेत जोशी म्हणाले, “यावर्षी कलर्स मराठी वेगवेगळ्या विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहे. नुकतीच सुरू झालेली काव्यांजली मालिका असो वा येऊ घातलेली कस्तुरी असो. यामध्ये दैनंदिन मलिकांसोबतच कथाबाह्य कार्यक्रमांचा देखील समावेश असणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर “ढोलकीच्या तालावर” हा डान्स शो आम्ही परत घेऊन येत आहेत. कार्यक्रमांच्या निवडीत तसेच वेळेमध्ये बदल करण्यात आले आहेत. कस्तुरी ही मालिका बहिण भावा मधील अतिशय सुंदर अश्या नात्यावर भाष्य करणार असून १०.३० या वेळेत ही मालिका आम्ही लाँच करत आहे आणि ११ वा. सुंदरा मनामध्ये भरली. यानिमित्ताने आम्ही दैनंदिन मालिकांना घेऊन पहिल्यांदाच विस्तारित प्राईम टाईम सुरू करत आहोत. आम्हांला खात्री आहे प्रेक्षकांचे असेच प्रेम आणि उदंड प्रतिसाद आमच्या मालिकांना मिळत राहील.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…