Home सामाजिक बावडा येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात मोफत प्रवेश 

बावडा येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात मोफत प्रवेश 

3 second read
0
0
86

no images were found

बावडा येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात मोफत प्रवेश 

कोल्हापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मराठा कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर येथील वसतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थीनींसाठी सन 2023-24 शैक्षणिक वर्षाकरिता मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छुक विद्यार्थीनींनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मराठा कॉलनी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल श्रीमती एस. ए. गडकरी यांनी केले आहे.

यामध्ये 8 वी, 11 वी, व्यावसायिक महाविद्यालय, बिगर व्यावसायिक महाविद्यालयामध्ये कोल्हापूर शहर व परिसरामधील प्रवेश घेऊ इच्छुक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय, इतर मागास व आर्थिकदृष्ट्या मागास, अपंग, अनाथ प्रवर्गातील विद्यार्थीनींना मोफत शैक्षणिक सोईसुविधा पुरविण्यात येतात. अधिक माहितीसाठी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मराठा कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर फोन नं. 0231-2600644,मोबाईल क्रमांक 9823192026 वर संपर्क सधावा.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मान

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंड…