Home राजकीय कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना अटक करा-हेमंत पाटील

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना अटक करा-हेमंत पाटील

10 second read
0
0
29

no images were found

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना अटक करा-हेमंत पाटील

 
पुणे,(प्रतिनिधी):छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्या सोबत करीत त्यांवे शौर्य आणि हिंदवी स्वराज्याचा अपमान करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना अटक करा, अशी मागणी भारत अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी सोमवारी (ता.१६) केली. महापुरुषांचा अपमान करण्याची वृत्ती काँग्रेसच्या ‘डीएनए’ मधेच आहे. केवळ काहींच्या तुष्टीकरणासाठी सपकाळ यांनी केलेले वक्तव्य धक्कादायक आणि समाजात तेढ निर्माण करणारे आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

        सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे.पुण्यात काँग्रेस कार्यालयासमोर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेली तुफान दगडफेकीच्या घटनेतून हे सर्व प्रकर्षाने अधोरेखित होतय, असे पाटील म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजाचे मावळे आणि राज्यातील तमाम जनतेच्या भावना सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. सपकाळ यांनी राज्याची माफी मागावी, असे मागणी पाटील यांनी केली.

        सपकाळ यांनी त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावल्याचा दावा करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या विधानातून हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी शोधली आहे, असे वक्तव्य करीत राज्याच्या प्रमुखावर चुकीचे आणि संभ्रम निर्माण करणारे आरोप करणाऱ्या सपकाळांना अटक होणे आवश्यक असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

        शिवाजी महाराजांनी पूर्णपणे नवीन राज्यव्यवस्था उभी केली; टिपू सुलतानांनी अस्तित्वात असलेल्या मैसूर राज्याचा विस्तार व आधुनिकीकरण केले.दोघांचा कालखंड, उद्दिष्टे, राज्यनिर्मितीची प्रक्रिया आणि संघर्षाची पार्श्वभूमी वेगळी होती. अशात दोघांना पूर्णपणे समकक्ष म्हणणे ऐतिहासिक दृष्ट्या अचूक ठरत नाही, असे पाटील म्हणाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…