Home सामाजिक शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील लोकांनी दिला प्रचंड प्रतिसाद चार दिवसात सुमारे १८ कोटींची उलाढाल:खा.धनंजय महाडिक 

शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील लोकांनी दिला प्रचंड प्रतिसाद चार दिवसात सुमारे १८ कोटींची उलाढाल:खा.धनंजय महाडिक 

22 second read
0
0
16

no images were found

शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील लोकांनी दिला प्रचंड प्रतिसाद चार दिवसात सुमारे १८ कोटींची उलाढाल:खा.धनंजय महाडिक 

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना प्रगतशील करण्याचे काम सरकार करत आहे.शहरातील सुविधा ग्रामीण भागात मिळाल्या तर लोकांचे स्थलांतर थांबेल आणि शेतीची प्रगती होईल.शिवाय एआय ही जादू आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दीडपट करण्याची क्षमता एआय मध्ये असल्याचे उद्गार        उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभप्रसंगी काढले.

  यावेळी बोलताना ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी धनंजय महाडक यांनी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यासपीठ उभे केल्याचे सांगितले.केंद्र व राज्य सरकार शेतीच्या विकासासाठी काय करत हे भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून समोर आले असून ज्या पद्धतीने ऊसापासून साखर निर्माण करण्यासाठी साखर कारखाने ४० वर्षापूर्वी सुरू झाले त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या विविध पिकांसाठीही वेगवेगळी सुविधा गाव पातळीवर सुरू होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

       यावेळी बोलताना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी बोलताना खासदार धनंजय महाडिक दरवर्षी शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन भरवतात आणि नवनवीन माहिती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात या प्रदर्शनाचा लाभ अनेक शेतकरी घेतात. मात्र शेतकऱ्यांनी याचा उपयोग आपल्या शेतीसाठी करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादनावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले. आज शेतकरी मातीचे परीक्षण करत नाहीत त्यामुळे पिकांना याचा फटका बसतो तर शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी खूप काही करायचे आहे. अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. कोल्हापूर हा कृषीप्रधान जिल्हा आहे याठिकाणी ऊस पिक मोठ्या पद्धतीने घेतले जाते शेतकऱ्यांनी इतरही पिके घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

       यावेळी प्रास्ताविकपर बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केलेल्या टिपू सुलतान बद्दलच्या वक्तव्याचा ही खरपूस समाचार घेतला.आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याशी इथले स्थानिक नेते काँग्रेसचे नेते आणि खासदार सहमत आहेत का याचं त्यांनी जाहीर रित्या उत्तर द्याव असे आव्हान ही खासदार महाडिक यांनी यावेळी दिले. आणि जोपर्यंत सपकाळ माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना कोल्हापुरात प्रवेश दिला जाणार नाही असेही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतीसाठी विविध योजना आणल्या जात आहेत किसान योजना आहे याचा १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे. साडेचार लाख करोड रुपये या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले गेले आहेत असे सांगितले अनेक योजनांच्या माध्यमातून २७ प्रकारचे व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे.शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोअरेजसाठी ९० टक्के सबसिडी दिली गेली आहे त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले.                 गेली १८ वर्ष भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती दिली जात आहे. परिपूर्ण असे प्रदर्शन भरविले जात आहे. कृषी प्रदर्शनात रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती असे सांगितले.

      समारोपप्रसंगी  विशेष अतिथी म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर श्री. उदय धांतुडे ,उपमहापौर अनिल डाळ्या यांची उपस्थिती होती.त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…