no images were found
नुतन महापौर सौ.रुपाराणी निकम व उप–महापौर अक्षय जरग यांचा कार्यालयीन प्रवेश
कोल्हापूर(प्रतिनिधी) :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या नुतन महापौर सौ.रुपाराणी निकम यांनी आज त्यांच्या महापालिकेतील कार्यालयात नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला. तर उपमहापौर अक्षय जरग यांनी त्यांच्या कार्यालयात आमदार विनय कोरे यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला.
यावेळी खासदार धनंजय महाडीक, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, गटनेता शारगंधर देशमुख, मुरलीधर जाधव, इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक ऋतूराज क्षिरसागर, माजी नगरसेवक जयंत पाटील, सत्यजित कदम, सुनिल कदम, विक्रम जरग, कृष्णराज महाडीक, पृथ्वीराज महाडीक, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव, राहुल चिकोडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, संग्रामसिंह 1निकम, नगरसेवक, नगरसेविका व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.