
no images were found
भाजपच्या वतीने बिंदू चौक येथे तीव्र निदर्शने
कोल्हापूर : कर्नाटक काँग्रेस प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीवली यांनी हिंदू हा पर्शियन शब्द असून त्याचा अर्थ अत्यंत घाणेरडा आहे, हिंदू हा शब्द आमच्यावर का थोपवला जातोय असे हिंदुविरोधी वक्तव्य केले. त्यातच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या धर्मवीर उपाधीसाठी मराठी लायक नाहीत असे घृणास्पद वक्त्यव्य करून शिवाजी महाराजांनी मुस्लिमांच्या मदतीने मोगलांच्या विरोधात लढा देत मशिदी उभारल्या, अशाप्रकारची मुक्ताफळे उधळली आहेत. त्यांच्या या वक्तव्याच्या व मराठ्यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर भाजपा च्यावतीने बिंदू चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.