
no images were found
२०२४ पर्यंत शिवरायांची तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी पाठपुरावा करु – मुनगंटीवार
मुंबई : लंडनमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावलं उचलल्याचे व शिवरायांची ‘जगदंबा तलवार’ परत मिळवण्यासाठी सरकार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी संपर्क साधणार असल्याबाबतची माहिती भाजपचे नेते व राज्याचे मंत्री सुधीर यांनी दिली.
त्यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, ‘भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळं ‘जगदंबा तलवार’ पुन्हा भारतात आणण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या ही तलवार ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात आहे., सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. तसंच, २०२४पर्यंत शिवरायांची तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी पाठपुरावा करु.
‘शिवरायांची हिरेजडीत ‘जगदंबा तलवार’ ब्रिटिश मोहापायी घेऊन गेले. शिवाजी महाराज विजयादशमीच्या शस्त्रपुजेच्या दिवशी रत्नजडीत ‘जगदंबा तलवारी’ची पूजा करायचे. ही तलवार इंग्रज घेऊन गेले आहेत. ऋषी सुनक पंतप्रधान झाले आहेत. ज्यांचा भारताशी संबंध आहे. मी क्रेंद्र सरकारला विनंती केली आहे. तसंच, मी सुनक यांनाही पत्रव्यवहार करणार आहे,’ असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
”जगदंबा तलवार’ ही आमच्या अस्मितेचं प्रतिक असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झाली आहे. ही तलवार महाराष्ट्राला परत करावी, असे पत्रही आम्ही केंद्राला पाठविलेले असून तसेच ब्रिटनच्या पंतप्रधानांनाही आम्ही विनंती करत आहोत,’ असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ‘शिवराज्याभिषेकाला २०२४ मध्ये साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याने त्यादृष्टीने राज्य सरकारकडून आराखडा तयार करण्यात येत आहे. यासर्व कार्यक्रमादरम्यान जर ब्रिटनने ‘जगदंबा तलवार’ दिली तर आमच्यासाठी हा आनंदोत्सव असेल,’ असेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.