
no images were found
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या रद्द
पुणे : पुणे – मुंबई प्रवास करणा-यांसाठी महत्वाची बातमी समोर आलीय. पुणे – मुंबई दरम्यान ३ दिवसांचा पॉवर ब्लॉक रहाणार असून अनेक गाड्या रद्द केल्या गेल्या आहेत. या मार्गाने प्रवास करायचा झाल्यास बाहेर पडण्यापूर्वी कोणकोणत्या गाड्या रद्द केल्या गेल्या आहेत याबद्दल खात्री करून घ्या.
१९ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत मध्य रेल्वेच्या मुंबई मार्गावर हा पॉवर ब्लॉक असेल. यामध्ये एकूण ३६ रेल्वे रद्द करण्यात आलेल्या आहेत त्य ५७ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आलेले आहेत. पुणे – मुंबई दरम्यान धावणा-या सर्वच महत्वाच्या रेल्वे २० नोव्हेंबरला बंद ठेवल्या आहेत.
करनाल पूल (मुंबईतील मशीद रोड स्थानक) हा पाडण्यात येणार आहे. या कारणासाठी २० नोव्हेंबरला पुणे-मुंबईच्या अनेक महत्वाच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. या कामासाठी ३ दिवस पॉवर ब्लॉक राहील. पुणे-मुंबई प्रवास करणा-यांना प्रवाश्यांना यामुळे काही अडचणींना सामोरे जावे लागेल. गाड्यांचे नियोजन असे असेल :-
१९ नोव्हेंबरला धावणा-या गाड्या- सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, बंगळुरु-मुंबई उद्यान एक्स्प्रेस, गदग-मुंबई एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस,
२० नोव्हेंबर रोजी रद्द असणा-या गाड्या – मुंबई- पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस, पुणे- मुंबई- पुणे सिंहगड एक्सप्रेस, मुंबई- पुणे- मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई-पुणे- मुंबई प्रगती एक्सप्रेस, मुंबई- पुणे- मुंबई डेक्कन एक्सप्रेस, मुंबई-हैदराबाद हुसैन सागर एक्स्प्रेस,