Home क्राईम ऑनड्युटी वाहतूक पोलिसाचा अपघातात मृत्यू

ऑनड्युटी वाहतूक पोलिसाचा अपघातात मृत्यू

0 second read
0
0
162

no images were found

ऑनड्युटी वाहतूक पोलिसाचा अपघातात मृत्यू

वर्ध्या : ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. वर्ध्या येथील खंडाळामध्ये ही दुर्घटना घडली आहे. ड्युटीवर उभ्या असलेल्या वाहतूक पोलीसास ट्रकने जबर धडक देत हा ट्रक दुभाजकावर चढला. या अपघातात या वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला आहे.

समुद्रपूर तालुक्यामधील राष्ट्रीय महामार्ग ४४ वरच्या खंडाळा शिवारात महामार्ग येथे वाहतूक पोलीस कर्मचारी वाहनांची तपासणी करत होते. दरम्यान उभ्या असलेल्या एका गाडीला ट्रकने मागून धडक दिली आणि हा ट्रक थेट पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर येऊन पुढे जात दुभाजकावर चढला.

या दुर्घटनेत वाहतूक पोलीस कर्मचारी गौरव खरवडे यांचा मृ्त्यू झाला आहे. ताबडतोब त्यांना समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल  केले गेले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी ट्रक चालक सुनील ढोणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरवडे आपल्या दहा सहकाऱ्यांसह महामार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत होते. यावेळी त्यांच्यावर काळाने झडप घातली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…