Home क्राईम पाडव्याच्या दिवशी देवदर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, नगरजवळ चौघांचा मृत्यू तर ११ जखमी

पाडव्याच्या दिवशी देवदर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, नगरजवळ चौघांचा मृत्यू तर ११ जखमी

3 second read
0
0
46

no images were found

पाडव्याच्या दिवशी देवदर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, नगरजवळ चौघांचा मृत्यू तर ११ जखमी

अहमदनगर : अहमदनगर-पुणे महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे .गुढी पाडव्याच्या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करून मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या गावाकडे निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावर नगर तालुक्यात कामरगाव शिवारात झालेल्या भीषण अपघातात ४ जण ठार तर ११ जण जखमी झाले. काल मध्यरात्री गावाकडे निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आहेत.. नगर जिल्ह्यात शनिशिंगणापूर आणि देवगड येथे दर्शन घेऊन ते गावी परतत होते.

या अपघाताबाबतची अधिक माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील आमदाबाद आणि चिंचोली मोर या गावातील १६ जण एका टेम्पोमधून प्रवास करत होते. नगर-पुणे महामार्गावर कामगारगावजवळ पुण्याकडून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या टेम्पोला धडक दिली. भरधाव वेगात असलेल्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक टेम्पोवर येऊन आदळल्याचे सांगण्यात आले. यामध्ये राजेंद्र साळवे, विजय अवचिते, धीरज मोहिते, मयूर साळवे यांचा मृत्यू झाला. जखमींना नगर शहरातील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्याची काही नागरिकांची प्रथा आहे. त्यानुसार शिरूर तालुक्यातील हे भाविक देवदर्शनासाठी एकत्रितपणे बाहेर पडले होते. टेम्पोतून प्रवास करीत त्यांनी नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर आणि देवगड येथेही दर्शन घेतले. त्यानंतर रात्री उशिरा ते आपल्या गावी निघाले होते. कामरगावजवळ मध्यारात्रीच्या सुमारा हा अपघात झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि नंतर पोलीसही मदतीला धावले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात चार जण ठार झाले असून त्यामध्ये एका बालकाचाही समावेश आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पूर आपत्ती नियंत्रणातील रु.९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता : आमदार श्री.राजेश क्षीरसागर

पूर आपत्ती नियंत्रणातील रु.९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता : आमदार श्री.राजेश क्षी…