Home राजकीय मोदी आडनावाचा अवमान; राहुल गांधीं यांना दोन वर्षांची शिक्षा

मोदी आडनावाचा अवमान; राहुल गांधीं यांना दोन वर्षांची शिक्षा

1 second read
0
0
144

no images were found

मोदी आडनावाचा अवमान; राहुल गांधीं यांना दोन वर्षांची शिक्षा

राहुल गांधी यांनी ‘मोदी आडनाव’वरून वादग्रस्त विधान केले होते, त्यावरुन सुरत कोर्टाने हा निर्णय दिला आहे..

सुरत: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सुरत येथील कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मानहानी प्रकरणात कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. ‘मोदी आडनाव’वरून वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात सुरत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर टीका करताना म्हटले होते की, सर्व चोरांची नावे मोदी कशी काय?, कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर गांधी यांनी तातडीने जामीनासाठी अर्ज देखील केला आणि न्यायालयाने त्यांची शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित केली.

आजच्या सुनावणीसाठी राहुल गांधी११च्या सुमारास सुरत कोर्टात हजर होते. निर्णय देण्याआधी कोर्टाने राहुल गांधी यांना विचारले की, तुम्हाला यावर काही बोलायचे आहे का? त्यावर राहुल गांधी म्हणाले, मी नेहमी भ्रष्ट्राचाराच्या विरोधात बोतो. मी कोणाविरुद्ध मुद्दाम बोललो नाही. यामुळे कोणाचे नुकसान झाले नाही. राहुल गांधींनी दोन वर्षापूर्वी मोदी आडनावावर वक्तव्य केले होते. कोर्टाने आयपीसी कलम ५०४ नुसार त्यांना दोषी ठरवले. गांधींच्या विरोधातील मानहानीची दोन प्रकरणं होती एक कलम ४९९ तर दुसरे कलम ५०४ नुसार होते. यात त्यांना ५०४ नुसार दोषी ठरवण्यात आले, ज्यात दोन वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.  कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला त्याच बरोबर शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित देखील केली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या संदर्भात वक्तव्य केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या शिक्षेच्या विरोधात राहुल गांधी उच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतात.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…